Amruta Fadnavis Ukhana For Devendra Fadnavis Saam Tv
महाराष्ट्र

Amruta Fadnavis: अमृता फडणवीसांनी लाडक्या बहिणींच्या देवाभाऊंसाठी घेतला खास उखाणा, म्हणाल्या, माझ्या नणंदा...

Amruta Fadnavis Ukhana For Devendra Fadnavis: अमृता फडणवीस या नेहमीच सामाजिक कार्य करत असतात. नुकत्याच एका कार्यक्रमात त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी उखाणा घेतला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस नेहमी चर्चेत असतात. अमृता फडणवीस यांना काल पुण्याचे माजी नगरसेवक किरण दगडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या महिला मेळाव्याला हजेरी लावली होती. या कार्यक्रमात अमृता फडणवीस यांनी महिलांशी संवाद साधला आहे. त्यांनी महिलांना जगण्याचा मंत्र सांगितला आहे. अमृता फडणवीस यांनी देवेंद्र फडणवीसांचे नाव घेत उखाणादेखील घेतला आहे. (Amruta Fadnavis Ukhana)

अमृता फडणवीस या गायिका आहेत. त्याचसोबत त्या सामाजिक कार्यात सक्रिय असतात. त्या नेहमी महिला सक्षमीकरणासाठी प्रयत्न करतात. त्यासाठी वेगवेगळ्या मेळाव्यांनादेखील भेट देतात. असाच उल्लेख त्यांनी उखाण्यातदेखील केला आहे. त्यांनी महिलावर्गाला संबोधित देवेंद्र फडणवीसांचे नाव घेतले आहे.

अमृता फडणवीसांचा उखाणा (Amruta Fadnavis Ukhana For Devandara Fadnavis)

अमृता फडणवीस कार्यक्रमात महणाल्या की, मी त्यांच्यासाठी आज चार ओळी म्हणणार आहे. आज माझ्या नणंदा दिसत आहेत खास, देवेंद्रजी आहेत तुमच्या पाठीशी, प्रगती व्हावी तुमची झक्कास.

या कार्यक्रमात बोलताना त्यांनी महिलांना आपल्या नणंदा म्हटलं आहे. त्यांनी महिलांना जगण्याचा मंत्र सांगितला आहे. त्या म्हणाल्या की, आता आपलं नात नंनद भावजयीचं नात आहे.मी पुन्हा येईल पण लेट नाही येणार. मला उशीर झाला मी तुम्हाला सॉरी म्हणार नाही. कौशल्य विकास याचा पण आज उद्घाटन केलंय आणि ते आपल्यासाठी स्त्रियांसाठी पण आपण आपलं कुटुंबाबलिष्ठ तर आपल्या समाज बलिष्ठ आणि मग आपला देश बलिष्ठ.

अमृता फडणवीस म्हणाल्या की,रोज हसायचं. मी पुढे माझ्या मुलीसाठी पण एक वाट मोकळी करू शकले असं वाटलं ते मी केलं. गाणं लग्नानंतर चालू ठेवलं. नाचणं असो किंवा बँकिंग असो मी सगळं चालू केलं.पण जेव्हाही कोणी टोले मारायचा मला तोंड करायचं तर मी काय करायचे लाफ्टर क्लब हसायचे आणि पुढे निघून जायची. चांगल्या कामासाठी तुम्हाला कोणी थांबू शकेल किंमत कोणाची झाली तर माझ्याकडे या डायरेक्ट तुम्हाला जी इच्छा आहे ते करा. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत पूर्णपणे लागून जा त्यामुळे तुमची मुलगी काय तुमचा मुलगा काय तुमचा कुटुंब सुखी होईल कारण स्त्री सुखी असली तर तिचं कुटुंब सुखी असतं तर त्यासाठी तुम्हाला सुखी व्हायला जे करायचं करा आम्ही तुमच्या पाठीशी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: विलास घुले हत्या प्रकरणात एका संशयताला SIT ने घेतले ताब्यात

१,४०० किलोमीटर लांबी, ८ लेन; महाराष्ट्रासह पाच राज्यांना जोडणार द्रुतगती मार्ग, जाणून घ्या महामार्गाचे वैशिष्ट्ये

कितीही खासदार फोडा, उरावर भगवा फडकवणार, ओमराजेंच्या मतदारसंघात ठाकरेंची तोफ धडाडली

Spring Roll Recipe: घरच्या घरी बनवा टेस्टी स्प्रिंग रोल; वाचा सोपी रेसिपी

केतनच्या हत्येमागचं डिजिटल कनेक्शन उघड, गुगलवर शोधले पर्याय, लोहगडावर सराव

SCROLL FOR NEXT