Amruta Fadnavis announces her resignation from Axis Bank after completing 23 years of service. Saam Tv
महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीसांचा राजीनामा, कारण काय?

Devendra Fadnavis Wife Banking Career Details: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी अ‍ॅक्सीस बँकेतील सीनिअर व्हाइस प्रेसिंडेट पदाचा राजीनामा दिला.

Omkar Sonawane

  • अमृता फडणवीस यांचा २३ वर्षांच्या सेवेनंतर अ‍ॅक्सीस बँकेतील वरिष्ठ व्हाइस प्रेसिंडेटपदाचा राजीनामा

  • मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून अॅक्सिस बँकेत सुरू केली होती कारकीर्द

  • सोशल मीडियावर भावनिक पोस्ट

  • सहकारी आणि वरिष्ठांचे मानले आभार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी अॅक्सिस बँकेतील सीनिअर व्हाइस प्रेसिडेंट या पदाचा राजीनामा दिला आहे. अ‍ॅक्सिस बँकेत त्या व्हाइस प्रेसिंडेंट म्हणून कार्यरत होत्या. Axis Bank मध्ये त्यांनी दोन दशकांहून अधिक काळ नोकरी केली. बँकेच्या विविध विभागांत त्यांनी महत्वाच्या जबाबदाऱ्या सांंभाळल्या आहेत. मॅनेजमेंट ट्रेनी ते सीनिअर व्हाइस प्रेसिडेंट अशी वेगवेगळी पदे त्यांनी भूषवली आहेत. 23 वर्षांनंतर त्यांनी नोकरीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. याबाबत त्यांनी भावनिक पोस्ट केली आहे.

23 वर्षांपूर्वी एक तरुण व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (Management Trainee) म्हणून Axis Bank मध्ये कारकीर्द सुरू केली होती. Amruta Fadnavis यांनी आज सीनिअर व्हाइस प्रेसिडेंट पदाचा (Senior Vice President) राजीनामा दिला आहे. या प्रवासाबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. भावनिक शब्दांत आपल्या कारकिर्दीतील आठवणी शेअर केल्या. बँकेतील ब्रांच ऑपरेशन्स (Branch Operations) पासून कॉर्पोरेट बँकिंग, ट्रेझरी ते कस्टमर रिलेशन्स अशा विविध विभागांमध्ये काम करताना या संस्थेने मला कुटुंब, मार्गदर्शक आणि दुसरे घर दिले, असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

आपल्या सहकाऱ्यांचे आणि वरिष्ठांचे विशेष आभार मानताना त्यांनी व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी Amitabh Chaudhry यांचाही विशेष आभार मानले. त्यांच्या पाठिंब्यामुळे हा प्रवास अधिक समृद्ध झाल्याचे त्यांनी सांगितले. हा सुंदर अध्याय संपत असला तरी आयुष्यभरासाठी शिकवण आणि मैत्री सोबत घेऊन जात आहे. 'धन्यवाद, Axis Bank' असेही त्यांनी पोस्टमध्ये नमूद केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : कल्याणमध्ये गांधारी रिंग रोड ठरतोय स्टंटबाजांचा अड्डा

Akola: उच्चभ्रू वस्तीत वेश्या व्यवसाय, पोलिसांनी धाड टाकली; २ महिला अन् एका पुरूषाला नको त्या अवस्थेत पकडलं

Saturday Horoscope: खास व्यक्तीसोबत संवाद होईल, पैशांची अडचण दूर होईल; वाचा शनिवारचे राशीभविष्य

Sunday Megablock : रविवारी प्रवाशांचे होणार मेगा हाल, 'या' मार्गावर असणार मेगा ब्लॉक; घराबाहेर पडण्याआधी वाचा वेळापत्रक

Pune : 'जुन्या खोडांना' बाजूला सारून नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार? शिवसेना पुणे शहरासाठी कोणाला नेमणार?

SCROLL FOR NEXT