crime file photo  saam tv
महाराष्ट्र

मोठी बातमी! उमेश कोल्हे हत्या प्रकरणात अमरावती पोलिसांचा मोठा खुलासा

राज्याच्या अमरावतीमध्ये मेडिकल व्यावसायिक उमेश कोल्हे यांच्या हत्या प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे. उमेश कोल्हे हत्या प्रकरणात आता पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे.

साम टिव्ही ब्युरो

अमर घटारे

अमरावती : राज्याच्या अमरावतीमध्ये (Amravati) मेडिकल व्यावसायिक उमेश कोल्हे यांच्या हत्या प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे. उमेश कोल्हे हत्या प्रकरणात आता पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट सोशल मीडियावर शेअर केल्यामुळेच कोल्हे यांची हत्या झाल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी आतापर्यंत सहा जणांना अटक केली आहे,अशी माहिती पोलिस उपायुक्त विक्रम साळी यांनी दिली आहे. ( Amravati Umesh Kolhe Murder News In Marathi )

भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषितांविरोधात एका वृत्त वाहिनीवर आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्याचे पडसाद देशासहित आखाती देशात देखील उमटले होते. याच नुपूर शर्मांच्या समर्थनार्थ उमेश कोल्हे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती. मात्र, नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ कोल्हे यांनी सोशल मीडियावर पोस्ट केल्यामुळे त्यांना धमक्या येऊ लागल्या होत्या. त्यानंतर २१ जून रोजी कोल्हे यांची हत्या झाली होती. कोल्हे यांची हत्या ही नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट केल्यामुळेच झाल्याची माहिती पोलिस तपासात उघड झाली आहे. तसेच पोलिसांनी या हत्या प्रकरणात आतापर्यंत सहा जणांना अटक केली आहे,अशी माहिती पोलिस उपायुक्त विक्रम साळी यांनी दिली आहे. तसेच उमेश कोल्हे हत्या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय संस्थेकडे (NIA) सोपवण्यात आला आहे.

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एनआयएला या घटनेचा तपास करण्याचे आदेश दिले आहेत. अमरावतीतील (Amravati) कोल्हे हत्या प्रकरणाचा संबंध उदयपूरमधील कन्हैयालालच्या हत्येशी संबंध तर नाही ना, याचा तपास एनआयए करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

एनआयए आणि एटीएस पथक अमरावतीत दाखल

दरम्यान याच प्रकरणाच्या चौकशीसाठी एनआयए (राष्ट्रीय तपास यंत्रणा) पथक आणि एटीएस पथक अमरावती शहरात पोहोचले आहेत. त्यांच्याकडून या प्रकरणाशी संबंधितांची स्थानिक पोलिसांकडून माहिती घेत आहेत. याआधी या प्रकरणात पाच आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. आता पोलिसांनी सहाव्या आरोपीलाही अटक केल्याची माहिती मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी ४ आरोपींना दिलासा

Success Story: आर्थिक परिस्थिती बेताची, अडचणींवर मात करत केली MPSC क्रॅक; सोलापूरच्या शेतकऱ्याची लेक झाली सरकारी अधिकारी

Accident News : राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचा थरार, भरधाव ट्रकची रिक्षाला धडक; दोघांचा जागीच मृत्यू

Crime news India: IRS ऑफिसरच्या मुलीची हत्या; आधी लैंगिक अत्याचार, नंतर मोबाइलच्या चार्जरने गळा आवळला

Long Hair Hairstyles: लांब केसांसाठी 5 मिनिटांत होणाऱ्या सोप्या हेअरस्टाईल्स कोणत्या?

SCROLL FOR NEXT