Accused Ahmed Ayan allegedly used a rented room to exploit and blackmail multiple victims in a shocking Amravati case. 
महाराष्ट्र

खोलीसाठी मित्राला द्यायचा 500 रुपये; अहमद अयान मुलींचं लैंगिक शोषण कसं करायचा? कुठे शूट करायचा डर्टी पिक्चर?

Amravati Physical Exploitation Racket: अमरावती शोषण प्रकरणात एक धक्कादायक खुलासा झाला आहे. आरोपी अहमद अयानने भाड्याच्या खोलीचा वापर करून १८० हून अधिक मुलींना कसे जाळ्यात अडकवले. त्यांना ब्लॅकमेल कसे केले याचा उलगडा झाला आहे.

Bharat Jadhav

  • आरोपीने प्रेमाच्या जाळ्यात अडकवून व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल केलं

  • आरोपीच्या मित्राने त्याला खोली उपलब्ध करून दिली

  • आरोपीकडून मोबाईल व इतर पुरावे जप्त करण्यात आले

अमरावतीच्या परतवाडा शहरात लैंगिक अत्याचार प्रकरणात एक धक्कादायक खुलासा झाला आहे. आरोपी अहमद अयाननं जवळपास १८० मुलींचे लैंगिक शोषण केले आहे, त्या पीडितेच्या व्हिडिओ बनवून तो त्यांना ब्लॅकमेल देखील करायचा. आता याप्रकरणी नवा खुलासा झाला आहे, अयानला त्याच्या काळ्या कारनाम्यात त्याचा मित्र मदत करायचा. त्याच्या कारनाम्यासाठी जागा उपलब्ध करून देत होता.

आरोपी पीडित तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढायचा नंतर त्यांच्यावर अत्याचार करायचा. पीडितांवर लैंगिक अत्याचार करत असताना तो त्यांचे काही फोटो आणि अश्लील व्हिडिओ काढायचा. आता या प्रकरणातील एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. आरोपी अहमद अयान हा पीडित तरुणींचं लैंगिक शोषण कसं करायचा? अश्लील व्हिडीओ कसे शूट व्हायचे याची माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे.

अहमद अयान हा पीडित तरुणींना अमरावतीच्या कठोरा नाका भागातील एका रेसिडेन्सीमधील फ्लॅटवर नेत असायचा. या फ्लॅटवर मुलींचे लैंगिक शोषण करायचा. त्याचे अश्लील व्हिडिओ रेकॉर्डिंग करत असायचा. तिसऱ्या मजल्यावर असणारा हा प्लॅट त्याच्या मित्राचा आहे. त्यासाठी तो त्याच्या मित्राला पाचशे रुपये द्यायचा. याच फ्लॅटवरून पोलिसांनी आता एका आरोपीला अटक केली आहे. या फ्लॅटमध्ये अनेकदा मुलीना आणल्या जात असल्याचेही धक्कादायक माहिती आता समोर आली आहे.

आतापर्यंत या लैंगिक शोषण प्रकरणात ६ आरोपींना अटक करण्यात आली आहे. चार जणांना चौकशी ताब्यात घेतले आहे. दरम्यान आरोपी अयान अहमद कठोरा नाका परिसरातील ज्या फ्लॅटवर मुलींना आणत होता. त्या रेसिडेन्सीमधील इतर लोकांनी फ्लॅट मालकाला यापूर्वी तक्रार केली होती, पण फ्लॅट मालकाने कुठलीही दखल घेतली नाही, असा आरोप तेथे राहणाऱ्या नागरिकांनी केला आहे. आरोपीने इतरही अनेक तरुणींना या प्लॅटवर आणलं होतं का? याचा सविस्तर तपास पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Location Tracking : फोन नंबर वापरून मोबाइल लोकेशन कसं शोधायचं? 'हा' आहे सुरक्षित मार्ग

Paneer Chilla Recipe: नाश्त्याला ५ मिनिटात बनवा टेस्टी अन् पौष्टिक पनीर चिला; नोट करा रेसिपी

Maharashtra News Live Update : हिंगोलीत भीषण अपघात, २ जणांचा मृत्यू

संभाजीनगर हादरले! हायकोर्टाच्या वकिलाची निघृण हत्या, मध्यरात्री रस्त्यात गाठले अन् सपासप वार

Summer Heatwave: राज्यात उन्हाचा पारा वाढला! उन्हाळ्यात काय करावे आणि काय टाळावे?

SCROLL FOR NEXT