महाराष्ट्र

Amravati Politics: तुमचा पक्ष तुम्हाला हेच शिकवतो का? अनिल बोंडेंच्या 'त्या' टीकेला यशोमती ठाकूर यांचं उत्तर

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अमर घटारे, अमरावती

Amravati Politics Anil Bonde Vs Yashomati Thakur:

कबड्डीच्या सामनाच्या उद्घाटन कार्यक्रमदरम्यान भाषणं करताना खासदार अनिल बोंडे यांची जीभ घसरली. तिवसा मतदारसंघ काँग्रेसच्या जंगली प्राण्याने उद्धवस्त केला. त्यामुळे येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांना झटका लावलाच पाहिजे, अशी टीका भाजप खासदार अनिल बोंडे यांनी काँग्रेसच्या नेत्या व आमदार यशोमती ठाकूर यांच्यावर टीका केली. ज्याप्रमाणे शेतात वन्य प्राणी घुसू नये, म्हणून झटका मशीन लावली जाते. तसाच झटका काँग्रेसला दिला पाहिजे, असे वादग्रस्त वक्तव्य अनिल बोंडे यांनी केले. (Latest News)

या वक्तव्याला आमदार यशोमती ठाकूर यांनी सडेतोड प्रतिउत्तर दिले आहे. खासदार डॉ. अनिल बोंडे यांच्या डोक्यात फरक पडलाय. डॉ. बोंडे त्यांच्या सांस्कृतिचे दर्शन त्या ठिकाणी करत आहेत. डॉ.बोंडे हे सुशिक्षित शिकलेले आहे की नाही कळायला मार्ग नाही. अनिल बोंडे वाद-विवाद करून नेहमी चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत असतात. याआधी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एका जाहिरातीमध्ये भाजप नेत्यांचे फोटो टाकले नाही म्हणून त्यांना बेडूक म्हटलं.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आता त्यांनी काँग्रेसवाल्यांना डुक्कर म्हटलं, त्यामुळे त्यांची संस्कृती आणि वागणं दिसत असल्याचा पलटवार यशोमती ठाकूर यांनी केला. पदोपदी तुम्ही महिलांचा अपमान करता तुमचा पक्ष तुम्हाला हेच शिकवतं का? असा सवाल देखील ठाकूर यांनी बोंडे यांना विचारला. एका साध्या शेतकऱ्यांच्या पोराने त्यांना पाडलं आहे, त्यांना जे आज खासदारकीचा गिफ्ट मिळालं आहे ते कॉन्ट्रोव्हर्सी करून मिळालं आहे. दंगली करवत स्वतःसाठी बक्षीस मिळवतात, अशी जोरदार टीका आमदार यशोमती ठाकूर यांनी अनिल बोंडेंना उत्तर देताना केली.

अनिल बोंडे यांचा २०१९ च्या निवडणुकीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते देवेंद्र भुयार यांनी पराभव केला. अनिल बोंडे सातत्याने यांनी काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी,सोनिया गांधीसह इतर काँग्रेसच्या नेत्यांबद्दल खालच्या भाषेत टीका करतात. याआधी सुद्धा यशोमती ठाकूर यांच्या ठाकूर आडनावावरून सुद्धा त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. अमरावतीमध्ये झालेल्या हिंसाचारामध्ये त्यांनी भडकाऊ भाषण दिलं होतं.

अमरावतीची दंगल अनिल बोंड यांनी भडकवली असा, आरोप देखील त्यांच्यावर अनेकांनी केला होता. त्यामुळे डॉ. अनिल बोंडे हे नेहमी वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत राहताना दिसून येते आहे. मात्र राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गाडगे महाराज,पंजाब देशमुख यांच्या पुरोगामी अमरावती जिल्ह्यात एवढ्या खालच्या पातळीवर टीका होत असेल तर सांस्कृतिक वारसा सांगणाऱ्या अमरावती शहराची गनिमा राजकीय नेते मातीत घालवत आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Virat Kohli Wicket: विराट कोहली आऊट नव्हताच! मात्र एका चुकीमुळे माघारी परतावं लागलं, Rohit भडकला -VIDEO

MNS News : 'मराठी माणसाला काम देणार नाही' म्हणणाऱ्याला मनसे स्टाईल चोप!

Maharashtra News Live Updates : शिरुरमधील साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत राडा

Pune CCTV Footage : रस्ता खचला, पुणे पालिकेचा ट्रक खड्ड्यात गाडला गेला; थरारक VIDEO

Medical College : वैद्यकीय शिक्षण महागलं, 5 पट शुल्क वाढ!

SCROLL FOR NEXT