Bacchu Kadu VS Ravi Rana News Saam TV
महाराष्ट्र

Amravati Politics : CM एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांपेक्षा मी रवी राणांना घाबरतो : बच्चू कडू

साम टिव्ही ब्युरो

अमर घटारे | अमरावती

Bacchu Kadu News :

अमरावती लोकसभा मतदारसंघातून नवनीत राणा यांना उमेदवारी निश्चित मानली जात आहे. नवनीत राणा या भाजपमध्ये प्रवेश करुन कमळ चिन्हावर निवडणूक लढवू शकतात. त्यामुळे महायुतीतील सर्व घटक पक्षांतील नेत्यांना नवनीत राणा यांचा प्रचार करावा लागेल. त्यासाठी त्यांना एका मंचावर यावं लागले असं आमदार रवी राणा यांनी म्हटलं होतं. रवी राणा यांच्या या वक्तव्याचा आमदार बच्चू कडू यांनी खरपूस समाचार घेतला आहे.

बच्चू कडू यांनी आपल्या खास शैलीत म्हटलं की, मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा रवी राणांना घाबरतो. खूपच भीतीचं वातावरण तयार झालं आहे.त्यामुळे मंचावर उपस्थित राहावंच लागेल. मला कार्यकर्त्यांचे फोन आले. एवढी मोठी हस्ती काहीही करू शकते. उद्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, चौकशी लागू शकते, अशी खिल्ली बच्चू कडू यांनी रवी राणा यांच्या वक्तव्याची उडवली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

देवेंद्र फडणवीस यांना भेटून आल्यानंतर ते जोरजोराने बोलतात. त्यामुळे आम्हाला भीती आहे. आम्ही घाबरलो असल्याने आमची इच्छा नसली तरी आम्हाला मंचावर जावं लागेल, प्रचार करावा लागेल. खूप कठीण झालं आहे सगळं, असा खोचक टोला बच्चू कडू यांनी लागवला आहे.

काय म्हणाले होते रवी राणा?

देशाच्या विकासासाठी देशाचे पंतप्रधान काम करत आहेत. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करण्यासाठी आमचा खासदार देता येत असेल तर आम्हाला त्याचा सार्थ अभिमान आहे. त्यांच्यासोबत युवा स्वाभिमान पार्टी व मी स्वतः ताकतीने उभा आहे.

महायुतीतील घटना पक्षातील नेतेही नवनीत राणा यांचा प्रचार करतील आणि एकाच मंचावर दिसतील. जे लोक महायुतीचं पालन करणार नाहीत त्यांच्या कारवाई करायला लावू. कुणी विरोधात जाऊन प्रचार करत असेल तर त्याच्यावर कारवाई होईल, असंही रवी राणा यांनी म्हटलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sri Lanka Tourism : श्रीलंकेत मनसोक्त आणि कमी खर्चात फिरता येणार; कसं वाचा संपूर्ण डिटेल्स

IOCL Recruitment: इंडियन ऑइलमध्ये अधिकारी होण्याची संधी; या पदासाठी सुरु आहे भरती; वाचा संपूर्ण माहिती

Nandurbar News : नंदुरबार दंगल..दगडफेक करणाऱ्या ४० जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात; शहरात तणावपूर्ण शांतता

Manoj Jarange Patil: उपोषणाचा चौथा दिवस, प्रकृती खालावली; मनोज जरांगेंचा उपचार घेण्यास नकार

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

SCROLL FOR NEXT