vijay aadkor saam tv
महाराष्ट्र

आत्महत्याग्रस्त पाेलीसाच्या कुटुंबाचा आयुक्तांवर राेष; कारवाईसाठी अंत्यविधी थांबवला

विजय आडाेकरांच्या आत्महत्येमुळे त्यांच्या कुटुंबियांना धक्का बसला आहे.

साम न्यूज नेटवर्क

- अमर घटारे

अमरावती : अमरावतीच्या (amravati) पोलीस आयुक्त आरती सिंग (arti singh) यांनी बदली (transfer) न केल्यामुळे माझ्या वडिलांनी (father) आत्महत्या केली असा आरोप आत्महत्या केलेले पाेलीस विजय आडोकार (amravati police vijay aadkor) यांच्या कुटुंबियांनी आज येथे केला आहे. दरम्यान जोपर्यंत आयुक्तांवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह उचलणार नाही अशी ठाम भूमिका कुटुंबियांनी घेतली आहे. (amravati latest marathi news)

अमरावती जिल्ह्यातील वलगाव पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे विजय आडोकार यांनी आज (बुधवार) सकाळी अमरावती येथील मध्यवर्ती कारागृहाच्या मागे गळफास लावून आत्महत्या केली. यामुळे त्यांच्या कुटुंबियांना धक्का बसला आहे.

दरम्यान आडाेकर यांनी अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंग व वलगाव येथील ठाणेदार विजयकुमार वाकसे यांच्यामुळे केल्याचा आराेप आडाेकर यांच्या कुटुंबियांनी केला आहे. आडाेकर यांच्या कन्येने साम टीव्हीशी बाेलताना माझ्या वडिलांची बदली अमरावती येथे केली नाही. ठाणेदार वाकसे यांच्या त्रासामुळे माझ्या वडिलांनी आत्महत्या केली असे नमूद केले.

आडाेकर यांची कन्या म्हणाली माझ्या वडिलांची तब्येत बरी नसताना आम्ही वारंवार डॉक्टरांचे पत्र सबमिट करूनही त्यांची बदली केली गेली नाही. आजारपणामुळे माझ्या वडिलांना त्रास होत होता. बदली न झाल्यानेच त्यांनी आत्महत्या केली. त्यामुळे जोपर्यंत दोषींवर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह उचलणार नाही अशी भूमिका आडाेकर यांच्या नातेवाईकांनी घेतली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

Monsoon Destinations : पावसाळ्यात स्वर्गाहून सुंदर दिसतात 'ही' ठिकाणे, ऑगस्टमध्ये प्लान करा ट्रिप

Paneer Ban : मोठी बातमी! राज्यात 'या' पनीरवर १ वर्षाची बंदी, सरकारचा मोठा निर्णय

Amruta Khanvilkar : अमृता खानविलकर लग्नाच्या ११ वर्षांनी घेणार घटस्फोट? नात्याबद्दल केला मोठा खुलासा

Abhijit Dipke: अभिजीत दिपकेंना अटक होणार? इन्फ्लुएन्सरचा CJPवर हल्ल्याचा आरोप, दिपकेंच्या अटकेसाठी इन्फ्लुएन्सर पोलिसात

SCROLL FOR NEXT