Amravati News Saam tv
महाराष्ट्र

Amravati News : दुधाच्या कॅनमध्ये चक्क गुरांच्या पानवठ्यामधले पाणी; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार

Amravati News : चांगले दूध मिळावे यासाठी अनेक नागरिक पिशवीतील पॅकिंगचे दूध न घेता थेट घरापर्यंत वाटप करणाऱ्या विक्रेत्यांकडून दूध घेत असतात

Rajesh Sonwane

अमर घटारे 

अमरावती : दूध विक्रेत्यांकडून दूधात पाणी टाकून किंवा दूध घट्ट व्हावे यासाठी पावडर टाकून भेसळ केली जात असल्याचे अनेकदा समोर आले आहे. मात्र अमरावतीमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दूध विक्रेता चक्क दूध वाटप करताना थांबून गुरांची पाणी पिलेल्या हौदातील पाणी दुधात टाकत असल्याचे समोर आले आहे. हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे.

दूध विक्रेते बाहेरून दूध घेऊन ते घरोघरी जाऊन त्याचे वाटप करत असतात. चांगले दूध मिळावे यासाठी अनेक नागरिक पिशवीतील पॅकिंगचे दूध न घेता थेट घरापर्यंत वाटप करणाऱ्या विक्रेत्यांकडून दूध घेत असतात. परंतु हे विक्रेते देखील दुधाची वाटप करताना त्यात पाणी टाकून भेसळयुक्त दूध ग्राहकापर्यंत पोहचवत असल्याचे प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे. अशा प्रकारामुळे लहान बालकांसोबत मोठ्यांचे देखील आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

एक नव्हे तर दोघांनी टाकले पाणी 

अमरावतीच्या (Amravati) एमआयडीसी परिसरातील हा धक्कादायक प्रकार असून एका मार्बल दुकानाच्या बाहेर पाण्याने भरलेल्या हौदात गुरांनी या हौदातून पाणी पिले. याच हौदातील पाणी दूध विक्रेते दुधात मिक्स करून त्याचे वितरण करत आहेत. अर्थात जे पाणी गुरे पितात तेच पाणी दुधात मिक्स करून अमरावतीकर नागरिकांना वाटप केले जात आहे. हा प्रकार एकाने नाही तर दोन जणांनी हौदातील पाणी दुधात मिक्स केल्याचे सीसीटीव्हीत दिसत आहे. याकडे अन्न व औषध प्रशासन विभाग लक्ष देणार का? असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

चेहऱ्याचं सौंदर्य खुलवतील 'या' 5 टिकली डिझाईन्स; प्रत्येक महिलेने आजच ट्राय करा

Maharashtra News Live Update: सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रतीक्षेनंतर मुसळधार पावसाला सुरुवात

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना! फक्त ₹5 लाख गुंतवा अन् कमवा ₹10 लाखांहून जास्त व्याज

Fat Loss: सुटलेलं पोट होईल झटपट कमी; सकाळी कोमट पाण्यात टाकून प्या हा घरातला फायदेशीर पदार्थ

जिमला जाण्याची गरज नाही! खुर्चीवर बसून करा 'हे' 5 योगा, पोटावरची चरबी होईल कमी

SCROLL FOR NEXT