Amravati News Saam tv
महाराष्ट्र

Amravati News : पाणी पुरवठा योजनेचे काम बंद केल्याने गावकरी सतप्त; ३५ गावात पाण्यासाठी उपोषण

Amravati News :अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यात आमदार देवेंद्र भुयार यांच्या विरोधात ३५ गावातील लोक आक्रमक झाले आहेत

Rajesh Sonwane

अमर घटारे 
अमरावती
: पाणी पुरवठा योजनेसाठी निधी मंजूर होता. मात्र योजनेचे निम्मे काम झाले असताना हे (Amravati) काम बंद पाडण्यात आले. यामुळे वरुड तालुक्यातील ३५ गावात पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. या कारणाने संतप्त झालेल्या ३५ गावातील ग्रामस्थांनी या विरोधात लाक्षणिक उपोषण केले आहे. (Breaking Marathi News)

अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यात आमदार देवेंद्र भुयार यांच्या विरोधात ३५ गावातील लोक आक्रमक झाले आहेत. वरुड तालुक्यातील ३५ गावाच्या पाणी पुरवठा योजनासाठी १०१ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. तर त्या कामाचे जवळपास ६० टक्के काम पूर्ण झाले आहे. या पाणी पुरवठा योजनेमुळे वरुड़ तालुक्यातील ३५ गावातील पिण्याच्या पाण्याचा पाणी प्रश्न मिटून शुद्ध पाणी पुरवठा गावकऱ्यांना मिळणार होता. मात्र आमदार देवेंद्र भुयार यांनी जाणीवपूर्वक स्वतःला कमिशन न मिळाल्याने ही योजना बंद केली; असा आरोप करत करण्यात आला आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तीव्र आंदोलनाचा इशारा 

या विरोधात माजी सभापती विक्रम ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ३५ गावातील लोकांनी केला आहे. तर बंद पडकेले काम सुरु कारण्यासाठी नागरिकांनी एकदिवशीय लाक्षणिक उपोषण सुरू केलं आहे. ही योजना सुरू करा; अन्यथा आंदोलन तीव्र करू असा इशारा विक्रम ठाकरे यांनी दिला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Seviyan Kheer Recipe: सणासुदीला घरी आलेल्या पाहुण्यासाठी झटरपट बनवा स्वादिष्ट शेवयाची खीर, वाचा सोपी रेसिपी

संतापजनक! बाथरूमच्या फलकावर लावला छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो

Maharashtra Live News Update: पुण्यात पाण्याच्या शोधात असणारा बिबट्या विहरीत पडला

वीर सावरकर बदनामी प्रकरणात मोठी अपडेट; सात्यकी सावरकरांकडून अचानक तो अर्ज दाखल, कोर्टात नेमकं काय घडलं?

Rajpal Yadav: जेलमधून बाहेर आल्यानंतर राजपाल यादव पुन्हा कामाला लागला; हसवणाऱ्या कलाकराने रडत रडत सगळा घटनाक्रम सांगितला

SCROLL FOR NEXT