Badnera Vidhan Sabha Saam tv
महाराष्ट्र

Badnera Vidhan Sabha : बडनेरामधून भाजपचे तुषार भारतीय यांची बंडखोरी; उमेदवारीची कायम ठेवत राणांबद्दल केला खळबळजनक दावा

Amravati News : बडनेरा मतदारसंघातून भाजपचे नेते तुषार भारतीय यांनी आपली अपक्ष उमेदवारी कायम ठेवली आहे. यामुळे या मतदारसंघात तिरंगी लढत होण्याचे जवळपास निश्चित

Rajesh Sonwane

अमर घटारे 
अमरावती
: अमरावती जिल्ह्यातील बडनेरा मतदारसंघात महायुतीमध्ये बंडखोरी कायम आहे. भाजप आमदार श्रीकांत भारतीय यांचे बंधू भाजप नेते तुषार भारतीय यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज कायम ठेवत अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विद्यमान आमदार रवी राणा यांचा मोठा झटका बसला आहे. 

विधानसभा निवडणुकीत अर्ज माघारीचा आज अखेरचा दिवस होता. यात बहुतांश मतदारसंघातून बंडखोरी करणाऱ्या उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतली आहे. यामुळे मतदारसंघातील निवडणुकीतील लढतीचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. मात्र अमरावती जिल्ह्यातील (Badnera) बडनेरा मतदारसंघातून भाजपचे नेते तुषार भारतीय यांनी आपली अपक्ष उमेदवारी कायम ठेवली आहे. यामुळे या मतदारसंघात तिरंगी लढत होण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. मात्र महायुतीची डोकेदुखी मात्र वाढली आहे. 

बंडखोरातील उमेदवार तुषार भारतीय यांनी रवी राणा (Ravi Rana) यांच्यावर टीका केली आहे. माझी उमेदवारी भाजप व बडनेरा मतदारसंघातील त्रस्त लोकांसाठी आहे. माझी बंडखोरी नाही, तर मैत्रीपूर्ण लढत आहे. मी लढणार व जिंकणार असं त्यांनी सांगितले. तर रवी राणा महायुतीचे उमेदवार नाही. तर भाजप व महायुती रवी राणांचा पाठिंबा काढणार असा खळबळजनक दावा तुषार भारतीय यांनी केला आहे. 

तसेच रवी राणा यांनी महायुतीच्या उमेदवाराविरोधात दर्यापूरमध्ये उमेदवार ठेवला आहे. बडनेरामध्ये पाठिंबा घेतला, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार हे लवकरच रवी राणा यांचा पाठिंबा काढणार असा खळबळजनक दावा भारतीय यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO शटडाऊन! ३ दिवस बंद राहणार PF पोर्टल, 'ही' कामं करताना येणार अडचणी; ५ पर्याय कोणते?

Maharashtra News Live Update: शिवसेना शिष्टमंडळाची महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन देत आंदोलनाचा इशारा

Chilli Potato Recipe: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल चिली पोटॅटो; वाचा खास रेसिपी

Maharashtra To Bihar Amrit Bharat Train: पुणे ते दानापुर दरम्यान धावणार ट्रेन; जाणून घ्या अमृत भारत ट्रेनचा मार्ग, कोचसंख्या टाईमटेबल अन् थांबा

RBI Digital Fraud Rules: डिजिटल फसवणूक प्रकरणी आरबीआयचा मोठा निर्णय; बँक देणार नुकसान भरपाई

SCROLL FOR NEXT