Unseasonal Rain Saam tv
महाराष्ट्र

Unseasonal Rain : चांदूरबाजार परिसरात गारपीटसह वादळी वाऱ्याचा पाऊस; गहू, कांद्याचे नुकसान

Amravati News : राज्यात अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यानुसार ७ एप्रिलपासून राज्यातील काही भागांमध्ये तुरळक स्वरूपाचा पाऊस झाला आहे. तर काही भागात ढगाळ वातावरण पाहण्यास मिळाले.

Rajesh Sonwane

अमर घटारे 

अमरावती : हवामान विभागाने राज्यातील काही भागात अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. (Amravati) या अंदाजानुसार मागील दोन दिवसांपासून अनेक ठिकाणी पाऊस झाला. तर आज सकाळी अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुक्यात गारपिटीसह वादळी वाऱ्याचा (Rain) पाऊस झाला. यामुळे शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. (Live Marathi News)

राज्यात अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यानुसार ७ एप्रिलपासून राज्यातील काही भागांमध्ये तुरळक स्वरूपाचा पाऊस झाला आहे. तर काही भागात ढगाळ वातावरण पाहण्यास मिळाले. दरम्यान अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुका परिसरात आज सकाळीच ढगाळ वातावरण होऊन वादळी वाऱ्यासह पावसाला सुरवात झाली. यावेळी लिंबूच्या आकाराची गार देखील पडली. अचानक आलेला पाऊस व गारपीट झाल्याने नागरिकांची धावपळ उडाली. 

  
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

गहू, कांदा संत्र्याचे नुकसान 

हवामान खात्याने अंदाज वर्तविल्याने (Farmer) शेतकरी चिंतेत होता. यामुळे काढणीला आलेले पीक शेतातून काढण्याच्या प्रयत्नात होता. मात्र  चांदुर बाजार तालुक्यात सकाळीच आलेला पाऊस व गारपिटीमुळे परिसरातील गहू, संत्रा व कांदा पिकांचे (Onion Crop) मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यात प्रामुख्याने तालुक्यातील थुगाव व पिंपरीमध्ये गारपीट झाल्याने गहू, कांदा या पिकांचे अधिक प्रमाणात नुकसान झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

UPI Rules: UPI च्या नियमांत मोठा बदल! आता ग्राहकांना हे ट्रान्झॅक्शन करता येणार नाही

Crocodile Viral Video: अबब! चक्क बाईकवरून मगरीचा प्रवास, Video होतोय व्हायरल

Maharashtra Politics: हिमतीला दाद! सूरज चव्हाणचं प्रमोशन, पक्षाने सोपावली मोठी जबाबदारी; रोहित पवारांचा अजितदादांना सवाल

Ekta Kapoor: सैनिकांचा अपमान, केस दाखल तरीही अॅक्शन नाही; पोलिसांनी कोर्टाला सांगितले 'या' कारणामुळे एकता कपूरवर नाही केली कारवाई

शिक्षकांच्या पगार घोटाळ्यावर सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; विशेष समिती करणार पडताळणी|VIDEO

SCROLL FOR NEXT