Amravati Gramin Police Saam tv
महाराष्ट्र

Fraud Case : रेल्वेत नोकरी लावून देण्याचे सांगत १७ तरुणांची दीड कोटीने फसवणूक; शिंदे गटाच्या शहराध्यक्षाविरुद्ध गुन्हा दाखल

Amravati News : योगेश इसोकर याने अनेक तरुणांना गाठत आपली रेल्वेमध्ये ओळख असल्याचे सांगत त्यांना नोकरीला लावून देण्याचे आमिष दाखविले. याकरिता विशिष्ट रक्कम द्यावी लागेल असे सांगत पैशांची मागणी

Rajesh Sonwane

अमर घटारे 
अमरावती
: नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत अनेकांची फसवणूक झाल्याचे प्रकार समोर आले आहेत. यातच अमरावतीमध्ये शिंदे गटाच्या शहराध्यक्षाने रेल्वे विभागात नोकरी लावून देतो असे आमिष देऊन तब्बल १७ तरुणांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी फसवणूक झालेल्या तरुणाने दिलेल्या तक्रारीवरून चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत. 

अमरावतीच्या अंजनगाव सुर्जी येथे सदरचा प्रकार उघडकीस आला आहे. शिवसेना शिंदे गटाचा पदाधिकारी अर्थात शिंदे गटाचा शहराध्यक्ष असल्याने ओळख असेल यातून तरुणांनी योगेश उर्फ मुन्ना इसोकार याच्यावर विश्वास ठेवला. तसेच योगेश इसोकर याने अनेक तरुणांना गाठत आपली रेल्वेमध्ये ओळख असल्याचे सांगत त्यांना नोकरीला लावून देण्याचे आमिष दाखविले. याकरिता विशिष्ट रक्कम द्यावी लागेल असे सांगत पैशांची मागणी केली. 

१७ तरुणांकडून घेतले दीड कोटी 

योगेश याने सांगितल्यावर तरुणांनी आपल्याला रेल्वेत नोकरी लागेल यावर विश्वास ठेवत पैसे दिले. यात साधारण १७ तरुणांकडून १ कोटी ५६ लाख रुपये हडपल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अनेक दिवस होऊन देखील नोकरी लागत नसल्याने तरुणांनी योगेश यांच्याकडे तगादा लावला. तरी देखील नोकरी लागत नसल्याने या प्रकरणात तरुणाच्या तक्रारीवरून अमरावती ग्रामीण पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. 

चार जणांविरोधात गुन्हा दाखल 

तरुणाने दिलेल्या तक्रारीवरून अमरावती ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या शहराध्यक्षासह चार जणांविरुद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल केल्याने चांगलीच खळबळ उडालीय. यात शिवसेना शिंदे गटाचा शहराध्यक्ष योगेश उर्फ मुन्ना इसोकार,  श्रीकांत फुलसावंदे, विलास जाधव आणि माँटी उर्फ मेघराजसिंह चव्हाण ठाकूर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावं आहेत. या  प्रकरणात मंगेश वसंतराव हेंड यांच्या तक्रारीवरून अंजनगावसुर्जी पोलिसानी चौघांविरुद्ध गुन्हे दाखल केला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kachya Kelichi Bhaji Recipe : हिरव्यागार कच्च्या केळीची चटपटीत भाजी, मुलं पुन्हा पुन्हा मागून खातील

Unseasonal Rain : साताऱ्यात बळीराजा संकटात, गारांच्या पावसाने जावळीला झोडपलं, गहू, ज्वारी पाण्यात

Suraj Chavan Video : "माझं इतकं मन दुखलंय ना..."; सूरज चव्हाणनं व्यक्त केली नाराजी, 'ती' एक गोष्ट गुलीगत किंगच्या जीवाला लागली

Eyelash Growth: पापण्या कमी असल्यामुळे डोळ्यांचा लूक फिका वाटतो? या सोप्या टिप्सने डोळे दिसतील रेखीव

Maharashtra Live News Update : गॅस सिलेंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी लातूरमध्ये प्रशासनाची 10 पथकं

SCROLL FOR NEXT