ravi rana and bachchu kadu  saam tv
महाराष्ट्र

Ravi Rana Vs Bachchu Kadu: घरातील लोकांचा खिसा कापला, बच्चू कडूंच्या सोबत गेलेल्या जितू दुधाने यांच्यावर रवी राणांचा 'प्रहार'

Ravi Rana Vs Bachchu Kadu: सर्वसामान्य लोकांचे पैसे त्यांनी घेतले नोकरीवर लावून देतो म्हणून पैसे अनेक लोकांना त्यांनी फसवले," असा आरोप रवी राणा यांनी केला.

Gangappa Pujari

अमर घटारे, अमरावती: राज्यात एकीकडे विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु असताना रणी राणा यांच्या पक्षाला मोठा धक्का बसला आहे. रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाचे मुख्य प्रवक्ते व त्यांचे अत्यंत विश्वासू माजी जिल्हाध्यक्ष जितू दुधाने यांनी बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षात प्रवेश केला. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बच्चू कडूंनी रवी राणा यांना हा जोरचा झटका दिला आहे. या पक्ष प्रवेशानंतर आता राजकारण चांगलेच तापले असून रवी राणा यांनी बच्चू कडूंवर जोरदार प्रहार केला आहे.

आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाचे प्रवक्ते व त्यांचे विश्वासू जितू दुधाने यांनी बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षात प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशानंतर आमदार रवी राणा यांनी यावर प्रतिक्रिया देत जितू दुधाने यांच्यावर गंभीर आरोप केला. "जितू दुधाने यांच्यावर आम्ही कारवाई करणार होतो, त्यापूर्वी तो पक्ष सोडून गेला. त्यामुळे दिल्या घरी सुखी रहा त्यांना माझा शुभेच्छा. जितू दुधाने यांनी घरामध्ये राहून घरातील लोकांचा खिसा कापला. सर्वसामान्य लोकांचे पैसे त्यांनी घेतले नोकरीवर लावून देतो म्हणून पैसे अनेक लोकांना त्यांनी फसवले," असा आरोप रवी राणा यांनी केला.

दुसरीकडे प्रहारमध्ये प्रवेश केल्यानंतर मी राजीनामा दिल्यानंतर पाच दिवस वाट पाहिली. मला प्रतिसाद मिळाला नाही. युवा स्वाभिमानीमध्ये कार्यकर्त्यांचं मरण होतं. असा आरोप यांनी केला. तसेच जितू दुधाने यांचा सन्मान प्रहार मध्ये राहील. कार्यकर्ता फोडला नाही त्यांनी घेतलेला निर्णय आहे व फोडाफोडीचं राजकारण आम्ही करत नाही अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली आहे.

दरम्यान, अमरावतीच्या अचलपूर येथे बच्चू कडू यांच्या उपस्थितीत जितू दुधाने यांचा प्रहारमध्ये प्रवेश झाला. शुक्रवारी जितू दुधाने यांनी रवी राणा यांच्या पक्षाचा राजीनामा दिला होता. पक्षात घुसमट होत असल्याने राजीनामा दिला असल्याचे जितू दुधाने यानी म्हटले होते. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जितू दुधाने यांनी युवा स्वाभिमान पक्षाचा राजीनामा देऊन प्रहार पक्षात प्रवेश केल्याने अमरावतीच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video:भाच्याच्या लग्नात मामाचा मृत्यू, बेफाम डान्स करताना अचानक कोसळले अन्...!

Maharashtra Live News Update : दहिसरहुन गुंदवलीला येणाऱ्या मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड

राज्यकर्ते गावात आल्यावर त्यांना रट्टे...; मनोज जरांगेंचा सरकारवर जोरदार हल्लाबोल, काय म्हणाले? VIDEO

Dombivli : डोंबिवलीत डॉक्टर-वकिलांच्या घरांची आधी 'रेकी', मग धाडसी घरफोडी; दरोडेखोरांचा थरार सीसीटीव्हीत कैद

Tooth Pain Relief: दात दुखतोय? हे घरगुती वापरा, काही मिनिटांत मिळेल आराम

SCROLL FOR NEXT