Amravati News Saam tv
महाराष्ट्र

Amravati News : स्वस्त धान्य दुकानात निकृष्ट दर्जाची ज्वारी; उबाठाचे पुरवठा अधिकाऱ्याचा दालनात आंदोलन

Amravati News : रेशन कार्ड धारकांना वाटप करण्यात येत असलेल्या धान्यात चालू महिन्यात ज्वारीचे देखील वाटप करण्यात आले आहे.

Rajesh Sonwane

 अमर घटारे 

अमरावती : रेशन कार्ड धारकांना स्वस्त धान्य दुकानातून मोफत धान्य वाटप केले जात असते. या महिन्यात वाटप करण्यात आलेल्या धान्यात ज्वारीचा देखील समावेश आहे. मात्र हि ज्वारी निकृष्ट दर्जाची असल्याने निकृष्ठ ज्वारी व भाकरी घेऊन उबाठाचे पदाधिकारी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याचा दालनात पोहचले व येथे आंदोलन केले. तसेच ज्वारी व भाकरी अधिकाऱ्याचा टेबलवर टाकली. 

रेशन कार्ड (Ration Card) धारकांना वाटप करण्यात येत असलेल्या धान्यात चालू महिन्यात ज्वारीचे देखील वाटप करण्यात आले आहे. दरम्यान नांदगाव खंडेश्वर तालुक्यात शासकीय स्वस्त धान्य दुकानात बीपीएल, एपीएल धारक गोरगरीब लाभार्थ्यांना निकृष्ठ दर्जाची ज्वारी वाटप केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. त्यामुळे (Shiv Sena) शिवसेना उबाठाचे नेते प्रकाश मारोटकर यांनी जिल्हा पुरवठा अधिकारीकडे निकृष्ठ दर्जाची ज्वारी व भाकरी घेऊन आंदोलन केले. 

अधिकाऱ्याकडून चौकशीचे आदेश 

आंदोलन करत ज्वारी व केलेली भाकर घेऊन ती निकृष्ठ ज्वारी पुरवठा अधिकाऱ्यांला दाखवली. अत्यंत दुर्गंधीयुक्त आरोग्यास हानिकारक असल्याची ज्वारी असल्याचा आरोप उबाठाचे प्रकाश मारोटकर यांनी केला. गोरगरीब लोकांच्या जीवनाशी हा खेळ असून ही निकृष्ठ ज्वारी वाटप बंद करा; अशी मागणी करण्यात आली. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी चौकशीचे आदेश दिले आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Satara Tourism : महाराष्ट्रातील 'मिनी काश्मीर' म्हणून ओळखलं जाणारं हे ठिकाण पाहिलं का? पावसाळ्यात दिसते अधिकच सुंदर

Akshay Kumar : अक्षय कुमारचे भीतीदायक हास्य तर सैफ अली खानच्या डोळ्यात आग; 'हैवान'चा फर्स्ट लूक आऊट, रिलीज डेट काय?

Maharashtra News Live Update: पीकविमा अर्जातील नव्या हमीपत्रामुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये संभ्रम

Mumbai Local: मुंबई हादरली! धावत्या लोकलमध्ये रक्तरंजित थरार, तिघांकडून तरुणावर कोयत्याने सपासप वार

Actor Shekhar Suman: शेखर सुमनचा भाजपात प्रवेश? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

SCROLL FOR NEXT