Amravati News Saam tv
महाराष्ट्र

Amravati News : धक्कादायक..डेंगू बाधित महिला रुग्णांवर जमिनीवर उपचार; आरोग्य विभागाचा हलगर्जीपणा

Amravati News : अमरावतीच्या मेळघाटातून आरोग्य व्यवस्थेचा गलथान व निष्काळजीपणाचा कळस गाठणारा प्रकार समोर आला आहे.

Rajesh Sonwane

अमर घटारे 

अमरावती : अमरावती जिल्ह्यात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. उपचारासाठी रुग्ण दाखल होत असून या रुग्णांवर उपचार करताना आरोग्य विभागाचा गलथानपणा व हलगर्जीपणा समोर आला आहे. कारण डेंग्यूची लागण झालेल्या महिला रुग्णावर चक्क जमिनीवर उपचार केले जात असल्याचे मेळघाटमध्ये समोर आले आहे. 

अमरावतीच्या (Amravati) मेळघाटातून आरोग्य व्यवस्थेचा गलथान व निष्काळजीपणाचा कळस गाठणारा प्रकार समोर आला आहे. अमरावतीच्या चिखलदरा तालुक्यातील हे जामली आर गावामध्ये दोन दिवसांपूर्वी अतिसाराच्या रुग्णांनी थैमान घातलं होतं. हे रुग्ण बरे होत नाही, तर आता डेंगूची रुग्ण इथे वाढत आहेत. सध्या गावात सहा डेंगूचे पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये महिलांची संख्या जास्त आहे. या डेंगू बाधित महिला रुग्णांवर जिल्हा परिषदेच्या शाळेत जमिनीवर उपचार केले जात आहे. 

अधिकाऱ्यांचे मात्र दुर्लक्ष 

अशा प्रकारे उपचार सुरु असताना मात्र या संपूर्ण प्रकाराकडे (Health Department) आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सपशेल दुर्लक्ष असल्याचे पाहायला मिळत आहे. तीन दिवसांपासून हा प्रकार सुरू आहे. मात्र कोणत्याही बडे अधिकाऱ्यांना रुग्णांना बेड उपलब्ध करून द्यावा; याची जाग आली नाही. ज्यावेळी यासंदर्भात आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारण्यात आलं, त्यावर अधिकारी सावरा सावर करताना दिसून आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IMD Rain Alert : महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ, मराठवाडासह देशभरात ७ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेंज

Maharashtra Politics : राज ठाकरे संपूर्ण भाषणात कुठेही 'ते' वाक्य बोलले नाही; एकनाथ शिंदेंच्या बड्या नेत्याचा थेट मुद्द्याला हात

Navi Mumbai - Kalyan: नवी मुंबईहून कल्याणला चुटकीसरशी पोहोचता येणार, वाहतूक कोंडीची कटकटच संपणार

Pregnancy Care : गरोदरपणात महिला मंदिरात जाऊ शकतात का?

SCROLL FOR NEXT