Navneet Rana vs Uddhav Thackeray  Saam TV
महाराष्ट्र

Navneet Rana News : 'मी तुरुंगात १५-१६ तास हनुमान चालीसा पठण करायची म्हणून ठाकरे सरकार कोसळलं'

अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

साम टिव्ही ब्युरो

अमर घटारे, साम टीव्ही

Navneet Rana vs Uddhav Thackeray : अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांनी मला महाविकासआघाडी सरकारच्या काळात जेलमध्ये टाकलं, त्यामुळे हनुमानजीने त्यांना दंड दिला. परिणामी ठाकरे सरकार कोसळलं, अशी टीका नवनीत राणां यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. (Latest Marathi News)

इतकंच नाही तर, मी तुरुंगात पंधरा-सोळा तास हनुमान चालीसा पठाण करायची त्याचाच दंड म्हणून ठाकरे सरकार कोसळलं, असंही त्या म्हणाल्या. खासदार नवनीत राणा यांनी अमरावती येथील एका कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला.  (Maharashtra Political News)

नेमकं काय म्हणाल्या नवनीत राणा?

महाआघाडी सरकारच्या काळात मला १४ दिवस ४७ डिग्री तापमानात जेलमध्ये राहावे लागले. तेव्हा मी सतत 15-16 तास हनुमान चालीसा वाचन केलं. त्याचवेळी मी म्हटलं एका बाईची बददुवा कधी वाया जाणार नाही. ती वायाही गेली नाही. हनुमानजीने त्यांना दंड दिला आणि ठाकरे सरकार पडलं, अशी टीका खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी केली.

संक्रांतीनिमित्त शुभेच्छा देताना लगावला टोला

दरम्यान, खासदार नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीका करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. संक्रांतीनिमित्त अमरावतीत युवा स्वाभिमान पक्षाकडून पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुद्धा नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला होता.

'अमरावतीसह महाराष्ट्राच्या जनतेकडून तुम्हाला तीळगुळ देते व या वर्षापासून गोड बोलायची सुरुवात करा यासाठी शुभेच्छा देते', असे राणा म्हणाल्या. यावेळी त्यांच्यासोबत आमदार रवी राणादेखील उपस्थित होते.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shivali Parab : शिवाली परब विठ्ठल नामात दंग, पाहा मनमोहक फोटो

BJP Leader: भाजप नेत्याला घेरत जीवघेणा हल्ला, भररस्त्यात संपवलं; आरोपी घटनास्थळावरुन फरार

Ind Vs Eng 2nd Test : दोन ओव्हर्स, दोन विकेट्स! आकाश दीपचा कहर, इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत

Loofah: प्लास्टिकचा लूफा वापरल्याने त्वचेवर काय परिणाम होतो?

Pune Crime : इंजिनीअरिंगमध्ये तीनवेळा नापास, नैराश्यात तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरुन थेट नदीत उडी

SCROLL FOR NEXT