Bacchu Kadu, Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ravi Rana  Saam TV
महाराष्ट्र

Bacchu Kadu : कोर्टात जाणार, शिंदे-फडणवीसांना नोटीस पाठवणार; बच्चू कडू काय म्हणाले, वाचा...

...अन्यथा आम्ही न्यायालयात जाणार असून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनाही नोटीस पाठवणार, असल्याचा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे.

साम टिव्ही ब्युरो

Mla Bacchu Kadu vs Ravi Rana : मागील काही दिवसांपासून अपक्ष आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) आणि रवी राणा यांच्यात शाब्दिक वाद सुरू आहे. दोघांकडूनही एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फेरी झाडण्यात येत आहे. बच्चू कडू यांनी गुवाहाटीला जाऊन कोट्यवधी रुपये लाटले असल्याचा आरोप आमदार रवी राणा यांनी केला होता. या आरोपानंतर बच्चू कडू प्रचंड़ आक्रमक झाले आहेत.

माझ्यावर केलेल्या आरोपांचे येत्या १ तारखेपर्यंत पुरावे सादर करा, अन्यथा आम्ही न्यायालयात जाणार असून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनाही (Eknath Shinde) नोटीस पाठवणार, असल्याचा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे. आमदार बच्चू कडू यांनी आज अमरावतीत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकारपरिषदेत त्यांनी हा इशारा दिला आहे.

काय म्हणाले बच्चू कडू?

रवी राणा यांनी केलेल्या आरोपांमुळे एकट्या बच्चू कडूंच्या नाही तर ५० आमदारांवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत. तसेच या आरोपांमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. एकंदरीतच या लोकांना पैसे देऊन आमदारांना गुवाहटीला नेले, असा त्याचा अर्थ होऊ शकतो, अशी प्रतिक्रिया आमदार बच्चू कडू यांनी दिली.

रवी राणा यांनी केलेल्या आरोपांचे पुरावे येत्या १ नोव्हेंबरपर्यंत द्यावेत. त्यांनी पुरावे न दिल्यास वेगळा निर्णय घेऊ, जर एका बापाची औलाद असेल, तर तो पुरावे देईल. जर नाही दिले तर त्याच्या (रवी राणांच्या) नावाची आम्ही घोषणा करणार, कोणावर आरोप करताना पुरावे असेपर्यंत बोलून नये, असा साधारण नियम आहे. याबाबतीत आम्ही न्यायालयात जाणार असून तसेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनाही नोटीस पाठवणार, असल्याचे बच्चू कडू म्हणाले.

गेल्या काही दिवसांपासून आमदार बच्चू कडू आणि रवी राणा हे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताहेत. किराणा वाटपावरून बच्चू कडू यांनी रवी राणा यांच्यावर टीका केल्यानंतर बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांसाठी आंदोलन केलं नसून सेटलमेंट केल्याचा आरोप राणांनी केला. इतकंच नाही तर, गुवाहाटीला जाऊन बच्चू कडू यांनी कोट्यवधी रुपये लाटल्याचा आरोपही राणांनी केला होता. रवी राणा यांच्या या आरोपानंतर बच्चू कडू प्रचंड आक्रमक झालेत.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bihar Election Result Live Updates : जालन्यात ढोल ताशाच्या गजरात भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष

Bihar Election Result : बिहारचा पहिला अधिकृत निकाल; JDU च्या उमेदवाराचा मोठ्या फरकाने विजय

Bihar Election Result: योगायोग! १५ वर्षांपूर्वी लालूप्रसादांसोबत जे झालं, तेच तेजस्वींसोबत घडलं; नितीशकुमार- भाजपचा चमत्कार

Maharashtra Live News Update: अवकाशी झेप घे रे पाखरा: जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांचा नासा दौरा, अमेरिकेत १० दिवस मुक्काम

Winter Skin Care : हिवाळ्यात खरखीत होणाऱ्या त्वचेवर उपाय, बदाम दूध फेसपॅक देईल चेहऱ्याला नॅचरल ग्लो

SCROLL FOR NEXT