Amravati Crime Saam tv
महाराष्ट्र

Amravati Crime : मिटिंग सुरु असताना डोळ्यात मिरची पूड टाकून दीड लाखाची लूट; भर दुपारच्या घटनेने खळबळ

Amravati News : उमेश राठोड हे वसुलीसाठी गेले असता १ लाख ६७ हजार रूपये जमा करून ते बडनेरा येथील मोमीनपुऱ्यात एका महिलेच्या घरी बचत गटाच्या महिलांची मिटींग घेण्याकरिता गेले होते

Rajesh Sonwane

अमर घटारे 
अमरावती
: भारत फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याच्या डोळ्यात मिरची पूड फेकून त्याच्या जवळील १ लाख ६७ हजार रुपये लंपास केल्याची घटना घडली आहे. सदरची घटना अमरावतीजवळ असलेल्या बडनेरा येथील मोमीनपुऱ्यात घडली असून आरोपी सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे, बडनेरा पोलिसांनी गुन्हा दाखल करून चोरट्याचा शोध सुरू केला आहे.

उमेश सुरेश राठोड हे भारत फायनान्स कंपनीमध्ये वसुलीचे काम करतात आणि बचतगटाच्या महिलांना फायनान्स करतात. (Amravati) दरम्यान उमेश राठोड हे वसुलीसाठी गेले असता १ लाख ६७ हजार रूपये जमा करून ते बडनेरा येथील मोमीनपुऱ्यात एका महिलेच्या घरी बचत गटाच्या महिलांची मिटींग घेण्याकरिता गेले होते. महिलेच्या घरात बसले असता अचानक एक युवक चेहऱ्याला दुपट्टा बांधून आला आणि उमेशच्या डोळ्यात मिरची पावडर फेकले आणि त्याच्या जवळील १ लाख ६७ हजार रुपयांची रक्कम हिसकावून पसार झाला. 

सीसीटीव्हीत चोरटा कैद 

सदर घटनेनंतर उमेश राठोड यांच्यासह परिसरातील नागरिकांनी आरडाओरडा केली. मात्र सदर लुटारु तरुण हा तेथून पसार झाला. घडल्या घटनेची माहिती (Badnera) बडनेरा पोलिसांना मिळताच त्यांनी तपास सुरू केला असून परिसरातील एका सीसीटीव्ही केमेरात हा चोरटा दिसून येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सोलापूरमध्ये जुनी मिल कंपाऊंड परिसरात छऱ्याच्या गोळ्यांचा स्फोट

मुख्यमंत्र्यांना मोठा धक्का; भावाने घेतला तडकाफडकी निर्णय, देशाच्या राजकारणात खळबळ

वर्क फ्रॉम होम, ऑनलाईन शाळा... अवघ्या २४ तासांत दुसऱ्यांदा PM मोदींचं नागरिकांना आवाहन, १० महत्त्वाच्या मुद्द्यांवर भर

MIM च्या नेत्याचं नगरसेवकपद जाणार? महापालिका झटका देणार, काय आहे प्रकरण?

Sabja Seeds For Hair Growth: केसांच्या वाढीसाठी सब्जा खाण्याची योग्य वेळ कोणती?

SCROLL FOR NEXT