IPL Online Betting Saam tv
महाराष्ट्र

IPL Online Betting : आयपीएलच्या फायनल मॅचवर ऑनलाईन सट्टा; अमरावतीत पोलिसांनी कारवाई, सहाजण ताब्यात

Amravati News : दोन्ही नवीन संघ असल्याने कोण विजेतेपद पटकावणार उत्कंठा क्रिकेट प्रेमींना लागून होती. अशातच सामन्यांवर मोठ्या प्रमाणात ऑनलाईन सट्टा खेळविण्यात येत असल्याचे अमरावतीमध्ये झालेल्या कारवाईत समोर आले आहे

Rajesh Sonwane

अमर घटारे 

अमरावती : इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलचा यंदाचा सिझन संपला आहे. आयपीएलमधील अंतिम सामना मंगळवारी पार पडला असून यात आरसीबीने विजेतेपद पटकावले आहे. मात्र या अंतिम सामन्यावर जोरदार सट्टा खेळविण्यात आला आहे. यात अमरावती शहरात अंतिम सामना सुरु असताना ऑनलाईन सट्टा चालविला जात असताना पोलिसांनी धाड टाकत कारवाई केली आहे. या कारवाईत सहा जणांना ताब्यात घेतले आहे.

इंडियन प्रीमियर लीग मागील दोन महिन्यांपासून सुरु होते. तर स्पर्धेतील अंतिम सामना ३ जूनला खेळविण्यात आला होता. यंदाच्या मोसमात अंतिम सामन्याच्या लढतीत पंजाब आणि आरसीबी हे दोन्ही नवीन संघ असल्याने कोण विजेतेपद पटकावणार उत्कंठा क्रिकेट प्रेमींना लागून होती. अशातच सामन्यांवर मोठ्या प्रमाणात ऑनलाईन सट्टा खेळविण्यात येत असल्याचे अमरावतीमध्ये झालेल्या कारवाईत समोर आले आहे. 

पोलिसांनी धाड टाकत कारवाई 

पंजाब आणि बेंगलोरमध्ये आयपीएलचा अंतिम सामना खेळवला जात होता. या दरम्यान प्रत्येक बॉलवर व कोण किती रन्स काढणार व कोण जिंकणार यावर सट्टा लावला जात होता. अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात कोण जिंकणार यावरच अधिक सट्टा लावण्यात येत होता. मात्र अखेरीला आरसीबीने यंदाचे विजेतेपद जिंकले आहे. याच दरम्यान अमरावती पोलिसांनी धाड टाकत सहा जणांना ताब्यात घेतले आहे. 

३ लाख ८९ हजारचा मुद्देमाल जप्त 

अमरावती शहर पोलिसांच्या क्राइम ब्रांच पथकाने आयपीएलच्या फायनल मॅचवर ऑनलाइन पद्धतीने सट्टा लावणाऱ्या सहा बुकींना अटक केली आहे. त्यांच्याकडून ३ लाख ८९ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गाडगेनगर व राजापेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली आहे. अमरावती शहर पोलिसांनी यात सहा आरोपीना अटक करून त्यांचे विरुद्ध गुन्हे दाखल केले आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

Ladki Bahin Yojana: महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

SCROLL FOR NEXT