Reels Accident Video Saam TV
महाराष्ट्र

Shocking News : रिल्स बनवायला गेले अन् 50 फूट खोल खाणीत पडले; तरुण-तरुणीसोबत घडलं भयंकर, पाहा VIDEO

Amravati Breaking News : इन्स्टाग्रावर रील्स बनवताना तरुण-तरुणी तब्बल 50 फूट खोल खाणीत पडले. अमरावती शहराजवळच्या मासोद येथील गट्टी खदान परिसरात ही घटना घडली.

Satish Daud

अमर घटारे, साम टीव्ही अमरावती

सोशल मीडियावर रील बनवून हिरो बनण्याच्या नादात काहीजण आपला जीव धोक्यात टाकतात. परिणामी अपघाताच्या मोठमोठ्या घटना घडतात. काही दिवसांपूर्वी सातारा येथील सज्जनगडावर रील बनवताना एक तरुणी 250 फूट खोल दरीत कोसळली होती. सुदैवाने झाडात अडकल्याने या तरुणीचा जीव वाचला होता. अशीच काहीशी घटना अमरावतीत घडली आहे.

इन्स्टाग्रावर रील्स बनवताना तरुण-तरुणी तब्बल 50 फूट खोल खाणीत पडले. अमरावती (Amravati News) शहराजवळच्या मासोद येथील गट्टी खदान परिसरात ही घटना घडली. या घटनेत तरुण-तरुणी दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

या थरारक घटनेचा व्हिडीओ (Viral Video) देखील समोर आलाय. व्हिडीओ पाहून अनेकांच्या काळजाचा थरकाप उडालाय. तरुण आणि तरुणी दोघांचेही वय अवघे १७-१८ वर्ष असल्याचं सांगितलं जातंय. दोघेही अवघे 17-18 वर्षांचे असल्याचे समजते.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, सदरील तरुण आणि तरुणी रविवारी संध्याकाळच्या सुमारास गिट्टी खंदान परिसरात फिरायला गेले होते. येथे उत्खनन पूर्ण झाल्याने मोठा खड्डा पडला आहे. तेथे उभे राहून दोघेही रिल्स शूट करीत होते. यावेळी तरुणीचा अचानक तोल गेला आणि ती 50 फूट खोल खदानीत पडली.

तिला वाचवताना तरुण देखील खदानीत पडला. दरम्यान, परिसरातील नागरिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिस आणि बचाव पथकाचे कर्मचारी तेथे दाखल झाले. अथक प्रयत्नांनंतर रात्री साडेआठच्या सुमारास त्या दोघांना खाणीतून बाहेर काढण्यात यश आलं. तरुण-तरुणीला गंभीर दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑर्डर ऑफ द रिपब्लिकने सन्मानित

Badlapur Firing : बदलापूर गोळीबार प्रकरणाला नवं वळण; गाळीबारामागे शिवसेना पदाधिकाऱ्याचा हात?

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

DR. MC Dawar Death : आधी २ रुपये, आता २० रुपयांमध्ये करायचे उपचार; गरीबांचे डॉक्टर पद्मश्री एमली डावर काळाच्या पडद्याआड

Maharashtra Politics: सुषमा अंधारे अन् कुणाल कामराच्या अडचणीत वाढ; विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मंजूर

SCROLL FOR NEXT