Dengue Positive Saam tv
महाराष्ट्र

Dengue Positive : अमरावती शहरात डेंग्यूची साथ; आठवडाभरात आढळले आठ पॉझिटिव्ह रुग्ण

Amravati News : अमरावती शहरात हळूहळू डेंगू व चिकनगुनिया हात पाय पसरवत असल्याचे दिसून येत आहे. पावसाळा सुरु झाल्यानंतर साथरोगांचा फैलाव होण्यास सुरवात झाली

Rajesh Sonwane

अमर घटारे  
अमरावती
: पावसाळ्याच्या सुरवातीपासूनच साथरोगांचा प्रसार होत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. यात अनेक शहरांमध्ये डेंग्यू या आजाराची साथ झपाट्याने वाढत आहे. यामध्ये अमरावती शहरात देखील रुग्ण संख्या वाढत असल्याचे चिंता वाढत असून मागील आठवड्यामध्ये अमरावती शहरात ८ जणांना डेंग्यूची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. 

अमरावती (Amravati) शहरात हळूहळू डेंगू व चिकनगुनिया हात पाय पसरवत असल्याचे दिसून येत आहे. पावसाळा सुरु झाल्यानंतर साथरोगांचा फैलाव होण्यास सुरवात झाली. अमरावतीमध्ये देखील थंडी, तापाचे रुग्ण संख्या मोठी असून रुग्णालयांमध्ये गर्दी होत आहे. यात काही डेंग्यूसदृश्य आजाराचे देखील रुग्ण आहेत. यामुळे जिल्हा रुग्णालयासह खाजगी रुग्णालयात देखील प्रचंड गर्दी पाहण्यास मिळत आहे. आता मागील आठवड्यात आणखी (Dengue Positive) डेंग्यूची लागण झालेल्या रुग्णांची भर पडली आहे. यामुळे महापालिका प्रशासन सतर्क झाली आहे अणे. 

दरम्यान अमरावती शहर हद्दीतील ३० जणांचे रक्ताचे नमुने घेण्यात आले होते. या पैकी तब्बल आठ नमुने डेंग्यू पॉझिटिव्ह निघाल्याने शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. २२ ते २८ जुलै या कालावधीत ही आकडेवारी आली असून यापैकी एक रुग्ण चिकनगुनिया बाधित देखील निघाला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क रहावे व एक दिवस कोरडा दिवस पाळावा. उघड्यावरील अन्न खाणे टाळावे, पाणी उकळून पिण्याचे आव्हान महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Rave party Case : प्रायव्हेट व्हिडिओ व्हायरल, एकनाथ खडसे यांच्याकडून गंभीर आरोप; पुणे पोलीस आयुक्तांकडून स्पष्टीकरण

Raigad : रायगडमध्ये मासेमारी बंदीच्या आदेशाचे उल्लंघन! 38 मच्छिमारांवर कारवाई | VIDEO

दह्यासोबत हे पदार्थ चुकूनही खाऊ नका, फूड पॉयझनचा असतो धोका

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं भाषण सुरू, मंचावर भाजप नेत्याच्या डुलक्या; व्हिडिओ व्हायरल

Narali Purnima 2025: यंदा नारळी पौर्णिमा कधी आहे?

SCROLL FOR NEXT