Ravi Rana Saam tv
महाराष्ट्र

Ravi Rana News : आमदार रवी राणांची मंत्रिपदासाठी लॉबिंग; मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता, राणा समर्थकांची अमरावती बॅनरबाजी

Amravati News : विधानसभा निवडणुकीत अमरावती जिल्ह्यात महायुतीला पहिल्यांदाच मोठे यश मिळाले आहे. याठिकाणी ८ पैकी ७ जागांवर महायुतीचे आमदार निवडून आले आहेत.

Rajesh Sonwane

अमर घटारे 
अमरावती
: विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीने सरकार स्थापन केले आहे. आता मंत्री मंडळ विस्ताराची प्रतीक्षा असून कोणाला मंत्री पद मिळणार याची उत्कंठा कार्यकर्त्यांमध्ये आहे. यात अमरावती जिल्ह्यात आमदार रवी राणा याना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मंत्रिमंडळात स्थान देणार असल्याचे बोलले जात आहे. त्या अनुषंगाने राणा यांच्या समर्थकांकडून शहरात बॅनर लावण्यात आले आहे. 

विधानसभा निवडणुकीत अमरावती जिल्ह्यात महायुतीला पहिल्यांदाच मोठे यश मिळाले आहे. याठिकाणी ८ पैकी ७ जागांवर महायुतीचे आमदार निवडून आले आहेत. हा विजय खेचून आणण्याचा मोठा हात असून राणा दाम्पत्याला सत्ता स्थापनेत मोठं गिफ्ट मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे राणा दांपत्य हे मुंबई आणि दिल्लीत तळ ठोकून असल्याचे पाहायला मिळत आहे. 

अमरावती जिल्ह्यात महायुतीचे सात आमदार निवडून आले आहे. यामध्ये रवी राणा यांना कॅबिनेट मंत्रीपद हे निश्चित असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांचा पराभव होऊन सुद्धा राणा दाम्पत्याने जिल्हा पिंजून काढत जिल्ह्यात महायुतीचे ७ आमदार विजयी केले. यात भारतीय जनता पक्षाचे पाच, युवा स्वाभिमानचे रवी राणा, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या सुलभा खोडके यांचा समावेश आहे. त्यामुळे राज्य मंत्रीमंडळात रवी राणा यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. 

कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी 

मंत्रिमंडळ विस्तार आगामी काही दिवसात असल्याने आमदार रवी राणा हे मुंबई व दिल्लीत तळ ठोकून आहे. अमरावतीचे पालकमंत्री व कॅबिनेट मंत्री पद रवी राणा यांना मिळणार असल्याची माहिती आहे. यामुळे जिल्ह्यात युवा स्वाभिमान व भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. रवी राणा हे भावी कॅबिनेट मंत्री अश्या आशयाचे कार्यकर्त्यांनी जिल्ह्यात बॅनर सुद्धा लावलेले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT