Amravati Crime News:  Saamtv
महाराष्ट्र

Amravati Crime News: खळबळजनक! चंद्रभागा नदीत आढळला युवकाचा मृतदेह; अपघात की घातपात? पोलीस तपास सुरू

Amravati News: या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून तळेगाव दशासर पोलीस अधिक तपास करत आहेत.

Gangappa Pujari

अमर घटारे; प्रतिनिधी...

Amravati News: अमरावती जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अमरातवीच्या घुईखेडच्या चंद्रभागा नदीत एका युवकाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आहे. (Crime News in Marathi)

अमरावती जिल्ह्यातील घुईखेड येथील चंद्रभागा नदीत एका युवकाचा मृतदेह आढळला आहे. या युवकाची हत्या करून नदीत फेकल्याचा प्रथमदर्शी अंदाज वर्तविण्यात येत आहे. अकबर अली जब्बार अली (वय ३५, रा. पुलगा) असे मृत तरुणाचे नाव आहे.

याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून तळेगाव दशासर पोलीस अधिक तपास करत आहेत. या तरुणाची हत्या कोणी व का केली? ही हत्या आहे की आत्महत्या अशा अनेक प्रश्नांचे उकल करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.

बापानेच केली मुलाची हत्या...

 सांगली जिल्ह्यातल्या मिरजमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. मिरज शहरातील सुभाष नगरमधील शिंदे हॉलजवळ राहणाऱ्या बापाने आपल्या मुलाची हत्या केली. रोहित राजेंद्र हांडीफोड (30 वर्षे) असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. तर राजेंद्र यल्लाप्पा हंडिफोड (50 वर्षे) असं आरोपीचे नाव आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dr.Anand Nadkarni : प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ, लेखक डॉ. आनंद नाडकर्णी यांचं निधन

Diabetes Control Sugar Free Drink: डायबिटीजसाठी 'हे' 5 ड्रिंक्स आहेत वरदान; रक्तातील साखर वाढणार नाही

Maharashtra News Live Update: खासदार मेधा कुलकर्णी इलेक्ट्रिक वाहनाने विधान भवनात दाखल

jalna Crime : लाडक्या बहिणीची बदनामी केली, भावाला राग अनावर, १९ वर्षाच्या तरूणाची केली हत्या

HSRP Update : महत्त्वाची बातमी! HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ; नियम मोडल्यास दंड

SCROLL FOR NEXT