Amravati Airport Saam tv
महाराष्ट्र

Amravati Airport : अनेक वर्षांपासूनची प्रतीक्षा संपली; अमरावती विमानतळावरून ३१ मार्चला पहिले टेक ऑफ

Amravati News : अमरावतीच्या विमानतळावरून विमान सेवा सुरू करावी, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासूनची अमरावती व आसपासच्या अकोला, यवतमाळ जिल्ह्यातील नागरिकांची होती

Rajesh Sonwane

अमर घटारे  
अमरावती
: गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या अमरावतीच्या विमानतळाचे काम पूर्णत्वास आले आहे. त्यामुळे महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाच्यावतीने विमानतळ सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात आला असून येत्या ३१ मार्चला अमरावती विमानतळावरून विमान सेवा सुरु करण्यात येत आहे. या निर्णयामुळे अनेक वर्षांची प्रतीक्षा आता संपली आहे.

पश्चिम विदर्भातील अमरावती शहर हे महत्त्वाचे विभागीय मुख्यालय आहे. मात्र या मुख्यालयातुन विमान सेवा अद्याप सुरू नव्हती. दरम्यान अमरावतीच्या विमानतळावरून विमान सेवा सुरू करावी, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासूनची अमरावती व आसपासच्या अकोला, यवतमाळ जिल्ह्यातील नागरिकांची होती. त्यानुसार सप्टेंबर २०२३ मध्ये इंदू कन्स्ट्रक्शन कंपनीने विमानतळाच्या कामाला सुरुवात केली होती. 

अमरावती शहरात विमानतळ बांधकामास सुरवात करण्यात आली होती. मात्र येथील कामाचा वेग मंदावला होता. परंतु विमानतळाचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी स्थानिक नेत्यांकडून पाठपुरावा सुरु ठेवत आता काम पूर्णत्वास होत आले आहे. विमानतळावरील धावपट्टीचे काम पूर्ण झाले, तर टर्मिनल इमारतीसह अन्य कामे होण्यात आहेत. यामुळे जुलै- ऑगस्टमध्ये विमान सेवा सुरु होण्याचे संकेत होते. परंतु यापूर्वीच विमान सेवा सुरु करण्यात येत आहे.

दरम्यान ऑक्टोबर २०२४ रोजी विमानतळाचे काम पूर्ण झाले. यामुळे आता विमान सेवा सुरु करण्याचा मार्ग मोकळा झाला असून येत्या ३१ मार्चला या विमानतळावरून विमा सेवा सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी केलेली आहे. त्या अनुषंगाने विमानतळावर सर्व सोयी सुविधा तयार करण्यात आल्या असून सुरक्षा यंत्रणा देखील तैनात करण्यात आलेली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT