Amravati News Saam Digital
महाराष्ट्र

Amravati News : ८४ वर्षांचे आजोबा तिसऱ्यांदा अडकले लग्नबंधनात; आजीबाईचाही आनंद गगनात मावेना

Amravati Marriage News : अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील चिंचोली रहिमापूर येथील कुटुंब प्रमुख विठ्ठल खंडारे यांनी वयाच्या ८४ वर्षी एका ६५ वर्षीय आजीबाई सोबत तिसरं लग्न केलं आहे.

Sandeep Gawade

अमरावतीच्या अंजनगाव सुर्जी येथील चिंचोली रहिमापूर गावात असं एक लग्न पार पडलं, ज्याची चर्चा राज्यभर रंगली आहे. लग्न करणं हे आपल्याकडे पवित्र बंधन मानलं जातं. एक लग्न करून आपल्या जोडीदारासोबत आयुष्य घालविण्याचा निर्णय अनेक जोडपी घेतात. पण काहीजणांचे साथीदार आपल्या जोडीदाराला सोडून जातात मात्र,काहीजणांना एकापेक्षा अनेक लग्नावर विश्वास असतो. अशावेळी ते आपलं वय देखील पाहत नाहीत. अशीच एक घटना अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील चिंचोली रहिमापूर येथे घडली आहे.

येथील कुटुंब प्रमुख विठ्ठल खंडारे यांनी वयाच्या ८४ वर्षी एका ६५ वर्षीय आजीबाई सोबत तिसरं लग्न केलं आहे. अंजनगाव सुर्जी तालुक्यातील चिंचोली रहिमापूर राहणाऱ्या या व्यक्तीने ८४ वयात तिसऱ्यांदा लग्न केले आहे. हा विवाह करण्यासाठी त्यांच्या कुटुंबातील मुलगा सून नातवंडांनी संमती दिली होती.

आता या वयस्कर माणसाच्या या करारनाम्यामुळे आता या कुटुंबांची खूप चर्चा तालुक्यासह जिल्ह्यात होत आहेत. विठ्ठल खंडारे असे या ८४ वर्षीय आजोबांचे नाव आहे. विठ्ठलरावाच्या पत्नीचे तीन ते चार वर्षांपूर्वी देवाज्ञा झाली त्यामुळे विठ्ठल रावांना जो मायेचा आधार पत्नी पासून मिळत होता तो कमी झाल्याने आपण दुसरा विवाह करतो असा माणस त्यांनी मुलानजवळ बोलून दाखवला होता.

परंतू याला कुटुंबातील मंडळीने विरोध केला. शेवटी वडीलांच्या अति आग्रहास्त त्यांची ईच्छा पूर्ण करण्यासाठी मुलगा सूनेने होकार दिला. आणि अकोट येथील ६५ वर्षीय महीलेशी चिंचोली रहिमापूर येथे विधीवत विवाह पार पडला असुन या आगळ्यावेगळ्या विवाह सोहळ्यासाठी त्यांच्या मुलामुलीसह नातवंडांनी आनंद घेत ठेका धरला. या विवाह सोहळ्याला परिसरातील नागरिकांनी उपस्थिती लावली होती. या विवाहाची चर्चा संपुर्ण जिल्ह्यात वाऱ्यासारखी पसरली असून प्रेमाला वयाचे बंधन नसते हे पुन्हा एकदा सिद्ध झालं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Red hammer in train: ट्रेनमध्ये असलेला लाल हातोडा नेमका कशासाठी? 99% प्रवाशांना माहीत नाही खरं कारण!

Married Life : नवरा-बायकोत सतत भांडण होतंय? बेडरूममधील या चुका असू शकतात कारणीभूत

Homemade Alshi Gel: नॅचरल ग्लो आणि सिल्की केसांसाठी घरी बनवा 'हा' जेल; 2 आठवड्यात दिसेल फरक

Maharashtra News Live Update: राहुल गांधींना मुंबई हायकोर्टाचा झटका; मानहानी प्रकरणातील समन्स रद्द करण्याची याचिका फेटाळली

एकनाथ शिंदेंनी लवकर शहाणे व्हावे, अन्यथा एका फटक्यात संपतील - जरांगेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT