Dengue Positive Saam tv
महाराष्ट्र

Amravati Dengue News : अमरावती जिल्ह्यात डेंग्यूचे ७२ तर चिकनगुणीयाचे ३२ रुग्ण; जिल्हा रुग्णालयात खाटा पडतंय अपूर्ण

Amravati News : पावसाळा सुरु होताच अमरावती जिल्ह्यात विविध आजारांनी डोकं वर काढले आहे. सध्या अमरावती जिल्ह्यात डेंग्यूचे ७२ आणि चिकनगुणीयाचे ३२ रुग्ण आढळून आले आहेत

Rajesh Sonwane

अमर घटारे 
अमरावती
: पावसाळा सुरू होताच साथरोगांच्या फैलाव होण्यास सुरवात झाली आहे. नाशिक जिल्ह्यात डेंग्यूचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळून आल्यानंतर अमरावती जिल्ह्यात देखील अनेकांना डेंग्यूची लागण झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. यासोबत जिल्ह्यात चिकुनगुनियाचे रुग्ण देखील वाढत आहेत. यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. 

पावसाळा सुरु होताच अमरावती जिल्ह्यात विविध आजारांनी डोकं वर काढले आहे. सध्या अमरावती जिल्ह्यात (Dengue) डेंग्यूचे ७२ आणि चिकनगुणीयाचे ३२ रुग्ण आढळून आले आहेत. इतकेच नाही तर जिल्ह्यात व अमरावती शहरात अनेकजण तापाने फणफणले आहेत. त्यामुळे अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयासह खाजगी रुग्णालयांमध्ये रुग्णांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. (Amravati) अमरावती जिल्हा रुग्णालयात विविध आजाराचे रुग्ण दाखल झाले असून रुग्णालयात दाखल रुग्णांसाठी आता जागा शिल्लक नाही. यामुळे एका बेडवर दोन रुग्ण उपचार घेत आहे.

आरोग्य यंत्रणा सतर्क 
अमरावती जिल्ह्यात रुग्णांची संख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाले आहे. ज्या भागात रुग्ण आढळून आले आहेत. त्या (Health department) भागात सर्व्हेक्षण करून उपाययोजना केल्या जात आहेत. तर पावसाळ्यात आपल्या घराबाहेर व घरात स्वच्छते बाबत काळजी घ्यावी; असं आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे यांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! भाजपा फुटली; राजकीय वर्तुळात खळबळ

Gold Price Today: सुवर्णनगरीत सोनं-चांदीच्या दरात घसरण, १ तोळा सोनं १ लाख ५८ हजार रुपयांवर

रोहित पवारांच्या जीवाला धोका? पवार कुटुंबाला रोहित पवारांची काळजी

Pune News: हा कसला मुळशी पॅटर्न! 'सिकंदर शेख'वर मैदानातच हल्ल्याचा प्रयत्न, मुळशीत कुस्तीला गालबोट; पाहा VIDEO

शिवजयंतीला राज ठाकरेंना वाघनखांची भेट; आता याच वाघनखांनी सगळ्यांशी शेकहँड करतो|VIDEO

SCROLL FOR NEXT