Morshi uncle nephew dies in the field Saam Tv News
महाराष्ट्र

Amravati News : कामानिमित्त दोघेही शेतात गेले, पुन्हा परतलेच नाही; कुंपणाचा शॉक लागून काका-पुतण्याचा जागीच अंत

Amravati Uncle and Nephew Die of Shock in Farm : वन्य प्राण्यांपासून पिकांचं नुकसान टाळण्यासाठी शेतकरी शेतात हे कुंपण लावतात. पण काही कामानिमित्त हे दोघेही शेतात गेले होते. पण नियतीला काही औरच मान्य होतं.

Prashant Patil

अमरावती : अमरावतीमध्ये एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. शेतात असलेल्या कुंपणाचा शॉक लागून जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील निंभी येथील काका पुतण्याचा दुर्दैवी अंत झाला आहे. वन्य प्राण्यांपासून पिकांचं नुकसान टाळण्यासाठी शेतकरी शेतात हे कुंपण लावतात. पण काही कामानिमित्त हे दोघेही शेतात गेले होते. पण नियतीला काही औरच मान्य होतं. जागीच दोघांचा मृत्यू झाल्याने कुटुंबीयांनी टाहो फोडला. संजय भुयार (वय ५५) आणि प्रणव भुयार (वय १८) असं मृत झालेल्या दोघांचं नाव आहे.

हिंगोलीमध्ये वीज पडून महिलेचा मृत्यू

दरम्यान, हिंगोलीमध्ये देखील अशीच दुर्दैवी घटना काल समोर आली आहे. हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील पारडी पोहकर परिसरात शेतकरी महिलेवर वीज कोसळली आहे. या घटनेत शेतकरी महिला जागीच ठार झाली आहे. मुक्ता गिरी असं या वीज कोसळून ठार झालेल्या महिलेचं नाव असून शेतशिवारात खरिपाच्या पेरणीची तयारी करण्यासाठी ही महिला गेली होती.

यावेळी अचानक वादळी वारे आणि पावसाला सुरुवात झाली आणि त्यामध्ये वीज पडून या महिलेच्या दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दरम्यान, या घटनेमुळे शेतकरी महिलेच्या गावासह परिसरात शोकळा पसरली असून या महिलेचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी सेनगावच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला होता. सध्या संपूर्ण राज्यात अवकाळी पाऊस सुरू आहे. या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. सेनगावमध्ये अधून मधून पाऊस चालू असून आज विजेचा कडकडाट अधिक पप्रमाणात होता. काही भागात मेघगर्जना ही होत होती.

याबाबत अधिक माहिती अशी की, नेहमीप्रमाणे मुक्ता गिरी ही महिला आज दुपारी शेतशिवारात खरीपाच्या पेरणीसाठी शेतात गेली यावेळी अचानक वादळी वारे व पावसाला सुरुवात झाली आणि त्यामध्ये वीज पडून यांचा मृत्यू झाला. यानंतर त्यांचा मृतदेह सेनगाव येथील रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अतिवृष्टीमुळे वरंधा घाट ३१ ऑगस्टपर्यंत बंद; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Badlapur Hidden Waterfalls: कोंडेश्वर ते नाणेघाट... बदलापूरजवळचे ८ अप्रतिम धबधबे; गर्दीपासून दूर निसर्गाचा मनसोक्त आनंद घ्या

Weight Loss Ice Cream Recipe : आईस्क्रीम खाऊनही वजन होईल कमी, वाचा 'ही' सीक्रेट रेसिपी

Mumbai Pune train : लोणावळ्याजवळ दरड कोसळली, ३१ एक्सप्रेसच्या वेळापत्रकात मोठा बदल, १७ ट्रेन रद्द, वाचा संपूर्ण यादी

Pune Schools Holiday: मोठी बातमी! पुण्यातील १०१ शाळांना आठवडाभर सुट्टी, पुढच्या सोमवारी भरणार शाळा, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT