maharashtra news AI Image
महाराष्ट्र

Maharashtra : मोर्शी नगरपरिषदेच्या छतावर ओली पार्टी; ड्रोन व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या तरुणाला मारहाण

Maharashtra Amravati News : अमरावतीच्या मोर्शी नगरपरिषदेच्या छतावरील कथित ओली पार्टीचा ड्रोन व्हिडिओ व्हायरल. व्हिडिओ शूट करणारे रमाकांत गावंडे यांच्यावर हल्ला.

Alisha Khedekar

  • अमरावती जिल्ह्यातील मोर्शी नगरपरिषदेच्या छतावर रात्री ओली पार्टी झाल्याचा आरोप

  • पार्टीचा ड्रोन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने परिसरात खळबळ

  • व्हिडिओ शूट करणारे रमाकांत गावंडे यांच्यावर ७ ते ८ जणांनी हल्ला केल्याचा गंभीर आरोप

  • जंगल परिसरात नेऊन बुक्क्या आणि लाथांनी मारहाण केल्याचा गावंडे यांचा दावा

अमरावती जिल्ह्यातील मोर्शी नगरपरिषद सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. राज्यात दुष्काळी परिस्थिती असताना नगरपरिषदेच्या इमारतीच्या छतावर रात्रीच्या वेळी ओली पार्टी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या पार्टीचा ड्रोनने चित्रित केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर परिसरात चर्चांना सुरुवात झाली असून हा व्हिडिओ शूट करणाऱ्या रमाकांत गावंडे यांच्यावर हल्ला झाल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मोर्शी नगरपरिषदेच्या इमारतीच्या छतावर काही अधिकारी, कर्मचारी आणि नगरसेवक एकत्र आल्याचे व्हिडिओमध्ये दिसत असल्याचा दावा केला जात आहे. विशेष म्हणजे, शासकीय कार्यालय बंद झाल्यानंतर रात्रीच्या वेळी ही पार्टी आयोजित करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. राज्यात पाणीटंचाई आणि दुष्काळाचे संकट असताना शासकीय इमारतीच्या छतावर अशा प्रकारची पार्टी कशी झाली, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. या पार्टीला नेमके कोणते अधिकारी उपस्थित होते, याबाबतही चर्चा सुरू आहे.

दरम्यान, या पार्टीचा ड्रोन व्हिडिओ चित्रित करणारे रमाकांत गावंडे यांच्यावर हल्ला झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. गावंडे यांच्या म्हणण्यानुसार, मोर्शी येथील खुल्या कारागृह परिसरातील शेतातून त्यांना जबरदस्तीने एका निर्जन जंगल परिसरात नेण्यात आले. तेथे ७ ते ८ जणांनी त्यांना बेदम मारहाण केली. या हल्ल्यात बुक्क्या आणि लाथांनी मारहाण करण्यात आली.

तसेच एका व्यक्तीच्या हातात चाकू होता आणि हालचाल केल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आली, असा आरोप गावंडे यांनी केला आहे. 'माझा संतोष देशमुख करायचा होता,' असेही त्यांनी म्हटले आहे. सध्या त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर सामाजिक कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला आहे. सामाजिक कार्यकर्ते निलेश रोडे यांनी मोर्शीचा बिहार झाला आहे, अशी टीका केली. हल्ल्यात सहभागी असलेल्या सर्व आरोपींना तातडीने अटक करून कठोर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. या घटनेच्या निषेधार्थ उद्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने मोर्शी बंदचे आवाहन करण्यात आले आहे. आता या प्रकरणात पोलीस काय कारवाई करतात आणि पार्टीच्या व्हिडिओमधील व्यक्तींबाबत काय माहिती समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ‘विरोधकांच्या नॅरेटिव्हकडे दुर्लक्ष करु नका’, रविंद्र चव्हाण यांच्याकडून मंत्र्यांच्या बैठकीत सूचना

Heart-Chest Pain : पोटभर जेवल्यानंतर छातीत दुखतंय? गॅस समजून दुर्लक्ष करू नका, असू शकते 'हे' गंभीर कारण

Tomato creamy Soup Recipe: थंडीच्या दिवसांत घ्या गरमागरम सूपचा आस्वाद! हॉटेलसारखे क्रीमी टोमॅटो सूप घरीच बनवा

High Blood Pressure : वाढलेला रक्तदाब कसा कमी कराल? आजपासूनच लाइफस्टाइमध्ये करा 'हे' ७ बदल

PF Transfer : जुना PF नवीन खात्यात कसा ट्रान्सफर करायचा? जाणून घ्या संपूर्ण नियम

SCROLL FOR NEXT