Navneet Rana VS Balwant Wankhede VS Dinesh Bub Maharashtra Lok Sabha Election 2024 Result Battle Saam TV
महाराष्ट्र

Amravati Lok Sabha : अमरावतीतून नवनीत राणा पिछाडीवर, मविआच्या वानखेडेंची आघाडी

amravati lok sabha constituency : अमरावती लोकसभा मतमोजणीला सुरुवात झाली आहे. या मतदारसंघात दुसऱ्या फेरी अखेर नवनीत राणा पिछाडीवर आहेत. तर बळवंत वानखेडे यांनी मोठी आघाडी घेतली आहे.

Vishal Gangurde

अमरावती : अमरावती लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीला सुरुवात झाली आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघात भाजपच्या नवनीत राणा आणि काँग्रेसचे बळवंत वानखेडे यांच्यामध्ये प्रमुख लढत पाहायला मिळत आहे. या मतदारसंघात काँग्रेस आणि भाजप उमेदवारांमध्ये चढाओढ दिसत आहे. या मतदारसंघात दुसऱ्या फेरी अखेरच्या मतमोजणीत भाजपच्या नवनीत राणा पिछाडीवर आहेत. तर काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखेडेंनी मोठी आघाडी घेतली आहे.

अमरावतीमध्ये मतमोजणीत दुसऱ्या फेरी अखेर काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखेडे यांनी आघाडी घेतली आहे. तर भाजप नेत्या नवनीत राणा या पिछाडीवर आहेत. अमरावतीमध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये चढाओढ पाहायला मिळत आहे. दुसऱ्या फेरी अखेर नवनीत राणा यांना ७११५ मते पडली आहेत. तर बळवंत वानखेडे यांना १५०९८ मते पडली आहेत. त्यामुळे दुसऱ्या फेरी अखेर बळवंत वानखेडे यांनी ७९८३ मतांनी आघाडी घेतली.

दरम्यान, निवडणूक आयोगाच्या ११ वाजताच्या ताज्या आकडेवारीनुसार, अमरावतीत काँग्रेसचे बळवंत वानखेडे यांना ४७,५८० मते मिळाली आहेत. काँग्रसचे वानखेडे १०६३ मतांनी आघाडीवर आहेत. तर नवनीत राणा पिछाडीवर आहेत. तसेच प्रहारचे दिनेश बूब आणि रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर देखील पिछाडीवर आहेत.

अमरावती लोकसभा मतदारसंघात ३७ उमेदवार रिंगणात आहेत. अमरावतीत युवा स्वाभिमानी पक्षातून भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपमध्ये प्रवेश करताच नवनीत राणा तिकीट मिळालं. तर महाविकास आघाडीने बळवंत वानखेडे यांना उमेदवारी दिली होती. तर या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीने आनंदराज आंबेडकरांना पाठिंबा जाहीर केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dearness Allowance: मोठी बातमी ! राज्य सरकारकडून कर्मचाऱ्यांना होळीचं गिफ्ट; ८ लाख निवृत्ती वेतनधारकांनाही होणार मोठा आर्थिक फायदा

IND vs ZIM T20 WC: झिम्बाब्वेचा दारूण पराभव; भारत उपांत्य फेरीपासून एक पाऊल दूर; हार्दिक बनला विजयाचा हिरो

रश्मिका मंदाना अन् विजय देवरकोंडा अकडले लग्न बंधनात; कपलची एक कृती ठरली चर्चेचा विषय

Rajya Sabha Election: उद्धव ठाकरे राज्यसभेवर जाणार? मविआमध्ये पडद्यामागे काय घडतेय?

Zilla Parishad: जिल्हा परिषद अन् पंचायत समितीच्या निवडणुकीनंतर सदस्यांबाबत सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT