Drone footage shows chaos after the groom was stabbed on stage during a wedding in Amravati’s Sahil Lawn. Saam Tv
महाराष्ट्र

लग्नमंडपात नवरदेवाला भोसकलं; ड्रोन कॅमेऱ्यात कैद झाला थरार

Drone Captures Groom Attack In Amravati: लग्नमंडपात नवरदेवावर सिनेस्टाईल जीवघेणा हल्ला झालाय...मात्र हल्ल्याआधी आणि हल्ल्यानंतर नेमकं काय झालं? ड्रोननं आरोपींचा पाठलाग करत.. कॅमेरेत आरोपीचे कारनामे कसे रेकॉर्ड झालेत?

Suprim Maskar

लग्नमंडपातील ही पळापळ आहे...नवरदेवावर हल्ला करणाऱ्या आरोपींना पकडण्यासाठी...अमरावतीच्या बडनेरा रोडवरील साहिल लॉनमध्ये सुजलराम समुद्रेचा विवाह सोहळा सुरु होता.. त्याचवेळी दोन तरुण शुभेच्छा देण्याच्या बाहाण्यानं स्टेजवर आले आणि त्यांनी नवरदेवावर चाकूनं हल्ला केला..त्यानंतर काय झालं...

नवरदेवावर झालेल्या हल्ल्यानंतर नववधू तिथेच चक्कर येऊन पडली. लग्नमंडपात आरडाओरडा सुरु झाला...त्यानंतर वडीलांनी आणि लग्नातील नातेवाईकांनी आरोपींना पकडण्याचा प्रयत्न केला... ड्रोन ऑपरेटरनेही चलाखीने आरोपीच्या मागावर ड्रोन फिरवला... आरोपींचे हल्ल्यानंतरचे सगळे कारनामे या ड्रोनमध्ये कैद झालेत...नवरदेवही गंभीर जखमी झालाय....त्यामुळे आरोपीला लवकर लवकर अटक करा, अशी मागणी कुटुंबियांनी केलीय...

दरम्यान हल्ला करणारा आरोपी राघो बक्षी हा नवरदेवाचा मित्र असल्याचं उघड झालयं.. तसचं जुन्या वादातून त्यानं हे कृत्य केल्याची माहिती समोर आलीय...त्यामुळे आरोपीच्या शोधासाठी पोलिसाचं पथक पाठवण्यात आलयं..

दुसरीकडे नवरदेवावर झालेल्या हल्ल्यानंतर समुद्रे कुटुंबियातील काहींनी राघव बक्षी याच्या घरी जाऊन दुचाकी आणि टीव्हीची तोडफोड केलीय...मात्र लग्न मंडपातच नवरदेवावर झालेल्या हल्ल्यानं शहरात एकच खळबळ उडालीय... आता पोलिस आरोपीच्या मुसक्या कधी आवळतात? या हल्ल्यामागे आरोपींचा नेमका हेतू काय होता? या सर्व गोष्टी तपासाअंती समोर येतीलच.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Elections:भाजपला रोखण्यासाठी काका-पुतण्या एकत्र? ठाकरेंपाठोपाठ दोन्ही राष्ट्रवादीचीही युती?

KDMC Election: भाजपा–शिवसेना शिंदे गटकाडून युतीचे संकेत; मात्र जागा वाटपाचा तिढा अजूनही गुलदस्त्यात

Kalyan Politics: फोडाफोडीवरून महायुतीत पुन्हा वाद; शिवसेनेनं नगरसेवक पळवल्यानंतर भाजप आक्रमक

Maharashtra Elections: बायको, मुलगा-मुलगी,भाऊ-बहिणींनाच हवीय उमेदवारी; नेत्यांना फक्त आपल्याच घरात हवं तिकीट

कराडची जामीनासाठी न्यायालयात धाव, सुटकेनंतर समर्थक काढणार हत्तीवरून मिरवणूक?

SCROLL FOR NEXT