ketaki chitale saam tv
महाराष्ट्र

Ketaki Chitale: संगीता ठाकरेंच्या तक्रारीनंतर केतकी चितळेवर गुन्हा दाखल

संगीता ठाकरे यांनी केतकी चितळेबाबत तक्रार केली हाेती.

साम न्यूज नेटवर्क

- अमर घटारे

अमरावती : समाज माध्यमातून (social media) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (ncp) अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांच्यावर अभिनेत्री केतकी चितळे (ketaki chitale) हिने आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी तिच्यावर अमरावतीत गुन्हा दाखल झाला आहे. (ketaki chitale latest marathi updates)

अमरावती जिल्हा ग्रामीण महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने अभिनेत्री केतकी चितळे हिच्या विरोधात अमरावती शहरातील गाडगेनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली हाेती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ग्रामीण महिला अध्यक्ष संगीता ठाकरे यांनी केतकी चितळी वर भारतीय दंड संहितेनुसार कलम ५०० आणि कलम ५०१ नूसार गुन्हा दाखल करा अशी मागणी देखील हाेती.

या तक्रारीची शहनिशा करुन आज (रविवार) गाडगेनगर पोलीस ठाण्यात केतकी चितळे विरुद्ध कलम ५०० आणि ५०१ नूसार दाखल केल्याची माहिती पाेलीसांनी दिली. दरम्यान अभिनेत्री चितळे हिच्या विराेधात राज्यातील विविध पाेलीस ठाण्यात तक्रारी दाखल हाेऊ लागल्या आहेत. त्यामुळे तिच्या अडचणीत वाढ हाेणार अशी शक्यता समाज माध्यमातून वर्तवली जात आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : नागपुरात भीषण अपघात, मित्राचा वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला जाताना दोन तरुणांचा मृत्यू

Maharashtra Politics: सुप्रीम कोर्टाबाहेर दोन्ही शिवसेनेत ड्रामा, राऊतांसोबत बोलता बोलता देसाई म्हस्केंकडे गेले; पुढे काय घडलं? VIDEO चर्चेत

मुलं ही पालकांची मालमत्ता नाहीत! हायकोर्टाचा ऐतिहासिक निर्णय; पालकांनो हे नक्की वाचा

Mumbai : दादरच्या पॉश एरियात भयंकर प्रकार! प्रसिद्ध मॉलमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली देहविक्री, ६ तरुणी नको त्या अवस्थेत आढळल्या

Tharala Tar Mag! : "सगळे पुरावे खोटे..."; अर्जुननं कोर्टात बाजी पलटली, सायलीला निर्दोष सिद्ध करण्यासाठी लढवली अनोखी शक्कल| VIDEO

SCROLL FOR NEXT