anil bonde saam tv
महाराष्ट्र

Breaking: 'मविआ' च्या मंत्र्याची बदनामी केल्याप्रकरणी भाजप नेत्यावर गुन्हा दाखल

अनिल बोंडे यांना अटक करावी अशी मागणी देखील मोहोड यांनी केली आहे.

साम न्यूज नेटवर्क

- अमर घटारे

अमरावती : महाविकास आघाडीतील (mva) मंत्र्याची बदनामी केल्याने भाजप (bjp) नेते व माजी मंत्री अनिल बोंडे (anil bonde) यांच्यावर अमरावती (amravati) येथील गाडगेनगर पोलिसांत (gadenagar police station) गुन्हा दाखल झाला आहे. काँग्रेसचे प्रदेश सचिव हरिभाऊ मोहोड (haribhau mohad) यांच्या तक्रारी वरून पालकमंत्री यशोमती ठाकूर (yashomati thakur) व राज्य शासनाची (maharashtra government) बदनामी केल्याप्रकरणी पाेलिसांनी भाेंडेवर गुन्हा दाखल केला आहे. (anil bhonde latest marathi news)

भाजप नेते अनिल बोंडे यांनी मंत्री यशोमती ठाकूर यांच्यावर अचलपूर दंगलीच्या (achalpur violence) मास्टरमाइंड असल्याचा आरोप केला हाेता. तसेच राज्य शासनावर देखील टीका केली हाेती.

भाेंडे यांच्या वक्तव्यावर काँग्रेसचे प्रदेश सचिव हरिभाऊ मोहोड यांनी मंगळवारी गाडेनगर पाेलीस ठाण्यात तक्रार नोंदविली हाेती. यामध्ये पालकमंत्री यशोमती ठाकूर यांची व शासनाची बदनामी त्याचबरोबर समाजात तेढ निर्माण करण्याचा भाेंडेनी प्रयत्न केल्याचे म्हटलं हाेते. दरम्यान अनिल बोंडे यांना अटक करावी अशी मागणी देखील मोहोड यांनी केली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tushar Apte : बदलापूर बलात्कार प्रकरणातील आरोपी भाजपचा स्वीकृत नगरसेवक

Shocking : "तुला पाळी आली असेल तर पुरावा दाखव", शिक्षिकेची अपमानास्पद वागणूक, विद्यार्थिनीचा मृत्यू; सरकारी कॉलेजमधील धक्कादायक प्रकार

Pooja Sawant Mangalsutra: मराठमोळा साज! हे आहेत लेटेस्ट ट्रेडिंग लांब मंगळसूत्राचे पॅटर्न

Yuzvendra And Dhanashree: डिव्होर्सनंतर युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा येणार एकत्र; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

Mumbai Fire : मुंबईत अग्नितांडव, बहीण-भाऊ अन् बापाचा होरपळून मृत्यू, गाढ झोपेत असतानाच....

SCROLL FOR NEXT