Daryapur Fire News Saam tv
महाराष्ट्र

Daryapur Fire News : तीन दुकानांना भीषण आग; लाखोंचे साहित्य जळून खाक

Amravati News : अमरावतीच्या दर्यापूर शहरातील गांधी चौक परिसरात असलेल्या टायर पंक्चरच्या दुकानाला गुरूवारी रात्रीच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली.

Rajesh Sonwane

अमर घटारे 

अमरावती : अमरावतीच्या दर्यापूर शहरात रात्रीच्या सुमारास तीन दुकानांना भीषण आग लागल्याची (Amravati) घटना घडली. आगीने रौद्ररूप धारण केल्याने तिन्ही दुकानातील लाखोंचे साहित्य आगीत जळून खाक झाले आहे. मात्र (Fire) आग कोणत्या कारणामुळे लागली याचे कारण अद्याप समजू शकले नाही. (Tajya Batmya)

अमरावतीच्या दर्यापूर शहरातील गांधी चौक परिसरात असलेल्या टायर पंक्चरच्या दुकानाला गुरूवारी रात्रीच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. आग लागल्यानंतर परिसरात धावपळ सुरु झाली. नागरिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीने क्षणार्धात रौद्ररूप धारण केल्याने आग विझविणे शक्य झाले नाही. आगीची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. यानंतर तात्काळ नगरपालिकेच्या अग्निशमन दल (Fire Brigade) दाखल होत कर्मचाऱ्यांनी येऊन आगीवर नियंत्रण मिळविले.


('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

लाखोंचे नुकसान 

दुकानांना लागलेली आग मोठ्या प्रमाणात असल्याने आगीत दुकानातील असलेले साहित्य व टायर जळून खाक झाले. यात लाखोंचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. दर्यापूर नगर पालिकेच्या अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठी हानी टळली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope : वृषभसह 'या' ३ राशींना नशिबाची साथ; शनिवार ठरणार आनंदाचा, प्रत्येक कामात मिळणार यश

एक कप चहामध्ये किती साखर घालावी? जाणून घ्या योग्य प्रमाण

Egg Yolk Benefits: अंड्याचा पिवळा भाग खाल्ल्याने वजन वाढतं का?

Rava Idli Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट घरच्या घरी बनवा मऊ आणि स्वादिष्ट रवा इडली; वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: पुण्यात विषारी दारूने घेतले १८ जणांचे बळी; बाहेरून 'गावठी' आणून 'मिथेनॉल' मिसळले

SCROLL FOR NEXT