yashomati thakur bacchu kadu 
महाराष्ट्र

काेणी मारली बाजी, यशाेमती ठाकूर की बच्चू कडू; जाणून घ्या

अरुण जोशी

या निवडणुकीत महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांचे सहकार पॅनल बाजी मारते की राज्यमंत्री बच्चू कडू यांचे परिवर्तन पॅनल बाजी मारणार याची उत्सुकता लागून राहिली हाेती.

अमरावती : अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीच्या मतमाेजणीस प्रारंभ झाला आहे. यंदाची निवडणुक रंगतदार झाल्याने सहकार की परिवर्तन पॅनेल काेण विजयी हाेणार याची उत्सुकता बॅंकेच्या सभासदांसह जनतेस लागली हाेती. अपेक्षेप्रमाणे सहकार पॅनलने १५ विरुद्ध ०५ असा परिवर्तन पॅनलचा धुव्वा उडिवला. या निवडणुकीत एका अपक्ष उमेदवाराने विजय मिळविला आहे. यशाेमती ठाकूर यांच्याकडे पुन्हा एकदा बॅंकेची सत्ता काय राहिली आहे. amravati-district-cooperative-bank-election-result-update-yashomati-thakur-bacchu-kadu-sml80

साेमवारी बॅंकेच्या निवडणुकीसाठी मतदान झाले. यामध्ये १६८७ पैकी १५७९ सभासद मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या बॅंकेचे संचालक मंडळ २१ जणांचे आहे. यामध्ये चार संचालक यापुर्वीच बिनविराेध निवडून आले आहेत. त्यामुळे १७ जागेसाठी निवडणूक झाली. त्यासाठी ४८ उमेदवार निवडणुक रिंगणात होते.

आज सकाळी आठ वाजता संत गाडगेबाबा सभागृहात मतमोजणीस प्रारंभ झाला. या निवडणुकीत सहकार (यशोमती ठाकूर) विरुद्ध परिवर्तन (बच्चू कडू) पॅनल अशी लढत आहे. या लढतीत परिवर्तन पॅनलचे संघटक बच्चू कडू यांनी विजय मिळविला.

अनिरुद्ध देशमुख विजयी; संजय खोडकेंचा पराभव

अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे बँकेचे माजी अध्यक्ष अनिरुद्ध उर्फ बबलू देशमुख यांचा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी पराभव केला असला तरी देशमुख यांनी आेबीसी मतदार संघातून विजय मिळवला आहे.

देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आणि परिवर्तन पॅनलचे प्रमुख संजय खोडके यांना ९१ मतांनी पराभूत केले. बबलू देशमुख यांना ८२५ मते तसेच संजय खोडके यांना ७३४ मते मिळाली आहेत.

सहकार पॅनेल विजयी उमेदवार

सुरेश साबळे तिवसा (बिनविराेध)

नरेशचंद्र ठाकरे वरुड (बिनविराेध)

अभिजीत ढेपे नांदगांव खंडेश्वर (बिनविराेध)

वीरेंद्र जगताप चांदूर रेल्वे

श्रीकांत गावंडे धामणगाव

सुधाकर भारसाकडे दर्यापूर

हरिभाऊ मोहोड भातकुली

सुनील वऱ्हाडे अमरावती

दयाराम काळे चिखलदरा

अनिरुद्ध उर्फ बबलू देशमुख

सुरेखाताई ठाकरे

मोनिका मार्डीकर

परिवर्तन पॅनलचे विजयी उमेदवार

राज्यमंत्री बच्चू कडू चांदूरबाजार

जयप्रकाश पटेल (धारणी) बिनविराेध

अजय मेहकरे (अंजनगाव सुर्ज़ी)

चित्रा डहाणे (मोर्शी)

रविन्द्र गायगोले (क1 - वैयक्तिक भागधारक मतदारसंघ)

अपक्ष विजयी उमेदवार

आनंद काळे अचलपूर

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमावर्ती भागात वादळी पावसाचे थैमान

Gold Price Today: सराफा बाजार उघडताच सोन्याच्या दरात मोठा बदल, वाचा २२ अन् २४ कॅरटचे आजचे दर

Namo Shetakri Yojana: शेतकऱ्यांनो नमो शेतकरी योजनेचे ₹२००० मिळाले का? अशा पद्धतीने चेक करा स्टेट्स

नांदेडमध्ये रक्तरंजित थरार ! गँगवारमध्ये तिघांचा मृत्यू, शहरात दहशत

Dandruff Home Remedy : केस धुवण्यापूर्वी करा 'हे' काम, टाळूला येणार नाही खाज अन् कोंडाही होईल गायब

SCROLL FOR NEXT