Amravati Crime News Saam tv news
महाराष्ट्र

Amravati Crime: अमरावती हादरली! मूल होत नसल्याने मांत्रिकाकडे गेली, उपचाराच्या नावाखाली मंत्र उच्चारत विवाहितेवर लैंगिक अत्याचार

Amravati Police: अमरावतीमध्ये एका विवाहित महिलेवर मांत्रिकाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मूल होत नसल्याने ही महिला मांत्रिकाकडे गेली होती त्यावेळी हा धक्कादायक प्रकार घडला.

Priya More

अमर घटारे, अमरावती

अमरावतीमध्ये विवाहितेवर मांत्रिकाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मूल होत नसल्याने पीडित महिला मांत्रिकाकडे गेली होती. मांत्रिकाची या महिलेवर वाईट नजर गेली. त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. या घटनेमुळे अमरावतीमध्ये खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मांत्रिकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मूल होत नसल्याने उपचार करतो म्हणत अमरावतीमध्ये एका मांत्रिकांने २० वर्षाच्या विवाहितेवर लैंगिक अत्याचार केले. अमरावतीच्या गाडगेनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही धक्कादायक घटना घडली आहे. पीडित महिलेच्या डोक्यावर मांत्रिकाने मंत्र उच्चारत तिच्यावर जबरदस्तीने लैगिंक अत्याचार केले. पोलिसांनी मांत्रिकाविरोधात बलात्कार तसेच जादूटोणा प्रतिबंधक कायद्याद्वारे गुन्हा दाखल केला. दिगंबर रतन चव्हाण असे या मांत्रिकाचे नाव असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

१० महिन्यांच्या काळात ३ वेळा गर्घारणा झाली मात्र ती टिकली नाही. त्यामुळे चिंताग्रस्त झालेल्या एका २० वर्षीय महिलेच्या असहाय्यतेचा फायदा घेत मांत्रिकाने तिच्या डोक्यावर मंत्र उच्चारून जबरदस्तीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. विवाहितेने विरोध केला तर त्याने तोंड दाबले तसेच या प्रकाराबद्दल कोणालाही सांगितले तर तुझ्यावर जादूटोणा करेल, अशी धमकी दिली. पीडित विवाहितेने दिलेल्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी मांत्रिकाविरोधात बलात्कार तसंच जाद्टेणा प्रतिबंघ कलमान्वये गुन्हा दाखल केला.

दिगांबर चव्हाण असं मांत्रिकाचे नाव असून तो पीडित महिलेच्या घरी आला होता. पीडित महिलेचा ६ एप्रिल २०२४ रोजी विवाह झाला. तिला मागील १० महिन्याच्या काळात ३ वेळा गर्भधारणा झाली मात्र ती टिकली नाही. त्यामुळे ती डॉकटरांकडे औषघोपचार घेत आहे. दरम्यान ५ फेब्रुवारीला दिगांबर चव्हाण हा मांत्रिक महिलेच्या घरी आला. त्याने विवाहितेच्या पतीचा हात पाहून त्याच्या अंगाला कपड्याच्या आतून लिंबू घासले. त्यानंतर त्याने पीडितेचा हात, बोट पाहिले. त्यानंतर तुला बाहेरचे ३ लोकं लागलेले आहेत, असे म्हणत तिच्या अंगालाही लिंबू घासले. त्यानंतर तिच्या हाता पायाला दोरा बांधून गळ्यात घालण्यासाठी ताबिज दिले.

त्यानंतर ७ फेब्रुवारीला रात्री पीडितेचे १२ ते ३ वाजताच्या दरम्यान प्रचंड पोट दुखले. त्यावेळी पीडितेच्या सासऱ्यांने दिगंबर चव्हाणला फोन करून सांगितले तर त्याने उद्या सकाळी ११ वाजता तिला घेऊन तुम्ही अमरावतीला या, मी बघतो असे म्हटले. त्यामुळे पीडिता सासऱ्यासह अमरावतीत या मांत्रिकाच्या एका नातेवाइकाकडे आली. माांत्रिकाने एका खोलीत पीडितेला बोलावले. त्यानंतर खोलीत बसलेल्या इरांना खोलीच्या बाहेर पाठवले आणि तिच्या सासऱ्याला खूप दारू पाजली. त्यांनाही बाहेर काढले. त्यानंतर पीडितेला तुझ्यावर उपचार करतो म्हणत झोपवले आमि तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. यावेळी कुणाला सांगितले तर तुझ्यावर जादूटोणा करेल असं धमकावले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT