Amravati Crime Saam tv
महाराष्ट्र

Amravati Crime : अमरावतीत सराईत गुन्हेगाराची निर्घृण हत्या, सलग दोन दिवसात दोन घटनांनी खळबळ

Amravati Crime News : मृत हा तीन महिन्यापूर्वीच कारागृहातून सुटला होता. तसेच एमपीडीए सारखे गंभीर गुन्हे देखील दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. कारागृहातील तीन महिन्यांपूर्वी सुटल्यानंतर त्याची हत्या करण्यात आली

Rajesh Sonwane

अमर घटारे 

अमरावती : अमरावती शहरात पुन्हा एकदा खुनाच्या घटनेने खळबळ उडाली आहे. तीन महिन्यांपूर्वी कारागृहातून सुटलेल्या तरुणाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. अमरावतीच्या वेंकयापुरा पुरा येथे सदरची घटना घडली आहे. सदर घटनेचा तपास करण्यात येत असून सलगपणे दुसऱ्या दिवशी खुनाची घटना घडल्याने अमरावती शहरात खळबळ उडाली आहे. 

अमरावती शहरातील वेंकयापुरा परिसरात घडलेल्या घटनेत ऋषिकेश उमेश मोडक उर्फ गोंडी (वय २६) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. मृत तरुणाच्या डोक्यावर चाकूचे गंभीर घाव करण्यात आलेले आहेत. तसेच त्याचा हात देखील जळालेल्या अवस्थेत आढळून आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जात पंचनामा केला. तसेच मृतदेह शासकीय रुग्णालयात नेत पुढील तपासाला सुरवात केली आहे. 

तीन महिन्यांपूर्वी सुटला होता कारागृहातून 
मृत ऋषिकेश मोडक हा तीन महिन्यापूर्वीच कारागृहातून सुटला होता. तसेच त्याच्या एमपीडीए सारखे गंभीर गुन्हे देखील दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. कारागृहातून तीन महिन्यांपूर्वी सुटल्यानंतर त्याची हत्या करण्यात आली आहे. दरम्यान ऋषिकेश मोडक याची हत्या नेमकी कोणत्या कारणातून झाली आहे याचे कारण अद्याप समजू शकलेलं नाही, मात्र या संदर्भातील अधिक तपास फ्रेजरपुरा पोलिस करत आहेत.

सलग दोन घटनांनी शहर हादरले

अमरावती शहरात सलग दोन दिवसात दोन हत्या झाल्याच्या घटना घडल्या आहेत.  अमरावती शहरातील फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन हद्दीतील वडाळी भागात आज भर दुपारी सराईत गुन्हेगाराची हत्या झाली असून काल देखील एकाची हत्या झाली होती. सलग दोन दिवसात हत्येच्या घटनेने अमरावती शहर हादरले आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Crime: लग्नसोहळ्यात चाकूने वार करत तिघांची निर्घृण हत्या, गुजरात बॉर्डरवरून ३ जणांना अटक; नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावरील गुंतवणुकीच्या आमिषात अडकला मलेशियन दूतावासातील कर्मचारी; गमावले 78.85 लाख

Ahilyanagar Crime: १५ वर्षीय मुलीचं अपहरण करत बलात्कार, ५ दिवस जंगलात डांबून ठेवले अन्...; अहिल्यानगर हादरले

Traffic Rules: चप्पल घालून कार चालवल्याने चलान लागतं? काय आहे नियम?

मोठी बातमी! भाजपा फुटली; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT