Amravati Crime Saam tv
महाराष्ट्र

Amravati Crime : वाळू तस्करीला विरोध; युवकावर प्राणघातक हल्ला, तीन जण पोलिसांच्या ताब्यात

Amravati News : विरूळपूर्णा येथील नदीवरून अवैध रेती तस्करीचा व्यवसाय केला जात होता. वाळू तस्करी करत असल्याने या तस्करीला गावातील नागरिकांनी विरोध केला होता. वाळू तस्करी रोखल्याने त्याचा राग मनात होता

Rajesh Sonwane

अमर घटारे 
अमरावती
: आजही अवैध वाळू तस्करी जोरदार सुरु आहे. वाळू वाहतुकीला मनाई असताना देखील चोरून वाळूची वाहतूक मोठ्या प्रमाणात केली जात आहे. अशाच प्रकारे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्याला विरोध केल्याने एका युवकावर तलवार व कोयत्याने वार करत प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना अमरावती जिल्ह्यातील आसेगाव पोलीस ठाणे अंतर्गत परिसरात घडली. यात हल्लेखोराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

अमरावतीच्या आसेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेत अजय कावरे हा युवक गंभीर जखमी झाला आहे. आसेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या गावात अनिकेत वाट हा विरूळपूर्णा येथील नदीवरून अवैध रेती तस्करीचा व्यवसाय केला जात होता. वाळू तस्करी करत असल्याने या तस्करीला गावातील नागरिकांनी विरोध केला होता. वाळू तस्करी रोखल्याने त्याचा राग मनात होता. 

भेटायला बोलावत केला हल्ला 

दरम्यान वाळू तस्करी रोखल्याने असता याचा वचपा काढत अजय कावरे याला अनिकेत वाट यांनी आसेगाव पूर्णा येथे भेटायला बोलावले. यानंतर त्याच्यावर दहा ते बारा जणांनी तलवार, कोयता व लोखंडी रॉडने मारहाण केली; असा आरोप अजय कावरे याने केला आहे. यामध्ये अजय कावरे हा गंभीर जखमी झाला असून या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती. 

तिघांना पोलिसांनी घेतले ताब्यात 

या प्रकरणी आसेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर अनिकेत वाटसह त्याच्या मित्रावर गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर अनिकेत वाट याच्यासह तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. तसेच या सर्वांना दोन दिवसाची पोलीस कोठडी देखील देण्यात आली आहे. अनिकेत वाट भाजपाचा कार्यकर्ता असल्याचे समजते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Government Jobs : वन विभागात 30 हजार पदांची बंपर भरती! गणेश नाईकांची मोठी घोषणा

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

दांडिया सुरू असताना कॉलेजमध्ये अनर्थ! लोखंडी सांगाडा कोसळून तरुणीचा मृत्यू, १७ विद्यार्थी जखमी, हादरवणारा व्हिडीओ

Nagpur Fort : विदर्भाची काशी! नदीच्या काठावर वसलाय ऐतिहासिक खजिना, सुट्टीत करा 'या' किल्ल्यावर भटकंती

Bigg Boss 20 : बिग बॉसमध्ये मोठा ट्विस्ट! अचानक बाजी पलटली, 'या' स्पर्धकाचा पत्ता कट

SCROLL FOR NEXT