Private Coaching Teacher Takes Her Life at Home Saam Tv
महाराष्ट्र

साताऱ्यानंतर अमरावतीत उच्चशिक्षित तरूणीचा आढळला मृतदेह; राहत्या घरात आयुष्याचा दोर कापला

Private Coaching Teacher Takes Her Life at Home: अमरावतीतील बडनेरा येथील २७ वर्षीय उच्चशिक्षित युवतीने आत्महत्या केली. राहत्या घरात गळफास घेऊन तरूणीनं आयुष्य संपवलं.

Bhagyashree Kamble

सध्या राज्यात साताऱ्यातील फलटण येथील प्रकरण तापलं आहे. डॉक्टर तरूणीच्या आत्महत्येनंतर दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. हे प्रकरण पोलीस आणि राजकीय दबावामुळे घडलं असल्याचं समोर आलं आहे. असंच एक प्रकरण अमरावतमधील बडनेरामधून समोर येत आहे. २७ वर्षीय उच्चशिक्षित युवतीनं आत्महत्या केली आहे. सध्या पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

रणदीप कौर रियाड (वय वर्ष २७) असे उच्चशिक्षित (एमएससी) युवतीचं नाव आहे. ही तरूणी बडनेरा येथील रहिवासी होती. ती उदरनिर्वाहासाठी एका खासगी कोचिंग क्लासेसमध्ये शिकवत होती. मात्र, तिचा राहत्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. तरूणीचा मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

तसेच बडनेरा पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत पंचनामा केला. तसेच अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले. या प्रकरणाचा सखोल तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे. तरूणीनं आत्महत्या का केली? आत्महत्या करण्यामागचं कारण काय? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. दरम्यान, या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care: लहानपणी होते तसे दाट, लांबसडक आणि चमकदार केस हवेत? मग घरीच करा 'हा' सोपा उपाय

Maharashtra News Live Update: मेळघाटात धक्कादायक प्रकार; दफन केल्यानंतर 23 दिवसांनी मृतदेह काढला बाहेर

मुगाची डाळ टाकून टाकळ्याची भाजी कशी बनवायची? सोपी रेसिपी

Amravati Crime : दफन केलेला तरुणाचा मृतदेह २३ दिवसांनी पुन्हा थडग्याबाहेर काढला; धक्कादायक आलं समोर?

Pune News: उद्यानातील झाडांवर फिरवली कुऱ्हाड, पालिकेचा कर्मचारीच निघाला 'पुष्पा'; लाकडं घेऊन जातानाचा VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT