Amravati crime Saam tv
महाराष्ट्र

Amravati crime: अमरावती हादरले..महाप्रसादाला नेण्याचे सांगत पाच जणांचा तरुणीवर अत्याचार; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

Amravati News : पीडितेला प्रसाद घेण्यासाठी मालखेड येथे घेऊन जातो, असे तिच्या आईला सांगून घेऊन गेला. दरम्यान पीडितेला त्याने रात्रभर त्याच्या घरी ठेवले

Rajesh Sonwane

अमर घटारे 

अमरावती : महाप्रसादाला नेण्याच्या निमित्ताने २३ वर्षीय तरुणीला अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील मालखेड येथे आणले. यानंतर परत नेऊन सोडण्याच्या (Amravati) बहाण्याने शेतातील झोपडीत नेत पाच जणांनी तिच्यावर अत्याचार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी वरुड तालुक्यातील शेंदूरजनाघाट (Police) पोलिसांनी आरोपींविरुद्ध अपहरण आणि अत्याचाराचा गुन्हा दाखल केला असून पाचही आरोपींना अटक करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

तरुणीवर अत्याचार प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींमध्ये महेश वाघमारे, पिंटू हरले, रमेश भलावी, इस्माईल खाँ, नितीन ठाकरे (सर्व राहणार मालखेड) यांचा समावेश आहे. यात महेश वाघमारे हा पीडितेला प्रसाद घेण्यासाठी मालखेड येथे घेऊन जातो, असे तिच्या आईला सांगून घेऊन गेला. दरम्यान पीडितेला त्याने रात्रभर त्याच्या घरी ठेवले. यानंतर २८ जानेवारीला तिच्या गावी सोडून देण्यासाठी महेशने तिला दुचाकीवर बसवले. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तरुणीला मारहाणही केली 

मात्र, गावी न नेता पिंटू हरले याला सोबतीला घेत त्याने तरुणीला मालखेड शिवारातील शेतात नेत दोघांनी तिच्यावर अत्याचार केला. यादरम्यान (Crime News) तिथं अन्य तिघे आले आणि त्यांनी देखील तिच्यावर अत्याचार केला. याला पीडितने विरोध केला असता लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच याबाबत कुठेही वाच्यता केली तर जीवानिशी मारू अशी धमकी देखील दिली. दरम्यान याप्रकरणी पिडितेने शेंदुरजनाघाट पोलिसात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून पाचही आरोपींना अटक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुणे जिल्ह्यातील घाट माथ्यावर जोरदार पाऊस

Rain Alert : राज्यात मुसळधार पाऊस धुमाकूळ घालणार! ३१ जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता; IMD चा मोठा अलर्ट

Building Collapse : भिवंडी हादरली! ४ मजली इमारत पत्त्यांसारखी कोसळली; दोघांचा मृत्यू, ढिगाऱ्याखाली काही जण अडकल्याची भीती

PM modi Video : पेपर लीकप्रकरणी पंतप्रधान मोदींचा व्हिडिओ मेसेज, घोटाळेबाजांना कडक इशारा

Today's Horoscope : 'या' ६ राशींसाठी शु्क्रवार अत्यंत भाग्यशाली! अचानक होणार धनलाभ? पाहा तुमचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT