Amravati Crime News Saam TV
महाराष्ट्र

Amravati Crime: संतापजनक! अमरावतीत १२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तीन नराधमांकडून सामूहिक अत्याचार

Amravati Crime News: अमरावतीत १२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तीन नराधमांनी सामूहिक अत्याचार केला आहे.

साम टिव्ही ब्युरो

अमर घटारे, साम टीव्ही

Amravati Crime News: गेल्या काही दिवसांपासून राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. यामध्ये अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचारांचं प्रमाण सर्वाधिक आहे. एकीकडे पोलिस अत्याचार करणाऱ्या आरोपींच्या मुसक्या आवळत असताना, दुसरीकडे अमरावती जिल्ह्यातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. (Latest Marathi News)

अमरावतीत १२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तीन नराधमांनी सामूहिक अत्याचार केला आहे. जिल्ह्यातील शिरजगाव कसबा पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुरूवारी (२७ एप्रिल) सायंकाळच्या सुमारास ही संतापजनक घटना घडली.

याप्रकरणी पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी (Police) पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून तातडीने तपासाची चक्रे फिरवत तिन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. या घटनेमुळे परिसरातून मोठा संताप व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १२ वर्षीय मुलगी जिल्ह्यातील (Amravati) शिरजगाव कसबा पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहते. पीडिता गुरूवारी सायंकाळच्या सुमारास घरालगत असलेल्या शेतात जनावरांसाठी चारा आणायला गेली होती. यावेळी तिच्या सोबत कुणी नसल्याचं पाहून आरोपींनी तिची वाट अडवली.

पीडितेला बाजूच्या एका शेतात नेत नराधमांनी तिच्यावर सामूहिक (Crime News) अत्याचार केला. अत्याचारानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. या संपूर्ण प्रकाराची माहिती पीडितेने कुटुंबीयांना दिली. त्यांनी तातडीने मुलीला घेऊन पोलिस ठाणे गाठले.

दरम्यान, तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत तिन्ही नराधमांच्या मुसक्या आवळल्या आहेत. या घटनेनं परिसरातून संतापाची लाट उसळली आहे. घटनेचा अधिक तपास शिराजगाव कसबा पोलीस करीत आहेत.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update:गृहमंत्री अमित शाह यांच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी काँग्रेसला पोलिसांनी दिली परवानगी

Healthy Lifestyle : तुमच्या वयानुसार शरीराला किती प्रोटीनची गरज आहे? जाणून घ्या योग्य प्रमाण

Curly Hair Care Tips : रोज स्ट्रेटनर वापरून कंटाळलात? करा हे सोपे उपाय; कुरळे केस होतील स्ट्रेट

Spain Migrants: स्पेनमध्ये समुद्रमार्गे हजारो नागरिकांची घुसघोरी, परिस्थिती चिघळली; १८ जणांचा मृत्यू, थरारक VIDEO

Gold Price Today : सलग दुसऱ्या सोन्याने घतली उसळी, प्रति तोळा इतक्या रुपयांवर दर पोहोचला; वाचा २४, २२ आणि १८ कॅरेटचे दर

SCROLL FOR NEXT