Amravati Latest News:  Saamtv
महाराष्ट्र

Amravati News: विजयी खासदारांचे बॅनर फाडल्याने अमरावतीत राडा, 'मविआ'चे कार्यकर्ते आक्रमक; ७ जणांना अटक

Amravati Latest News: बॅनर फाडल्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. याप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई करत सात जणांना अटक करण्यात आली आहे.

Gangappa Pujari

अमर घटारे, अमरावती|ता. ११ जून २०२४

अमरावती शहरातील राजकमल चौकात महाविकास आघाडीचे नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखडे यांच्या अभिनंदनाचे बॅनर फाडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. याप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई करत सात जणांना अटक करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, रविवारी (९ जून) देशाचे नवे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतली. सलग तिसऱ्यांदा मोदींनी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर अमरावती शहरात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात आला. यावेळी शहरातील राजकमल चौकात काँग्रेसचे नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखडे यांचे बॅनर फाडण्यात आले.

शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी हे बॅनर लावले होते. या घटनेनंतर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या मांडला होता. तसेच शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी यावर कारवाई न केल्यास अमरावती बंदचाही इशारा दिला होता. त्यानंतर आता पोलिसांनी मोठी कारवाई करत ७ जणांना अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, या घटनेने महाविकास आघाडी तसेच महायुतीचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी २० भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच पोलिसांनी भारतीय जनता पक्षाचे बॅनरही काढले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Facebook मध्ये होणार मोठा बदल! App उघडताच दिसणार रिल्स व्हिडिओ

Maharashtra News Live Update: राहुल गांधी खासदारांसह जंतरमंतरकडे निघाले

Rajpal Yadav : सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीशांसमोर भावूक झाला राजपाल यादव, आता काय म्हणाला?

Health Care : ओव्हरथिंक करून वैतागलात का? 6 उपाय करा, आजूबाजूला दुःख फिरकणारही नाही

Car on 20000 salary: दरमहा 20 हजार रुपये पगार असेल तर कोणती कार घेण्याचा विचार कराल?

SCROLL FOR NEXT