Amravati Accident News: Saamtv
महाराष्ट्र

Amravati Accident News: अमरावतीत भीषण अपघात! प्रवाशांनी भरलेली बस दरीत कोसळली, ३ जणांचा मृत्यू; ३६ गंभीर जखमी

Amravati Accident News: अमरावती जिल्ह्यतील चिखदाराजवळ बस दरीत कोसळून भीषण अपघात झाला असून या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक प्रवासी जखमी झाले आहेत.

Gangappa Pujari

अमर घटारे, अमरावती|ता. २४ मार्च २०२४

Amravati Bus Accident News:

अमरावतीमधून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. अमरावती जिल्ह्यतील चिखदाराजवळ बस दरीत कोसळून भीषण अपघात झाला असून या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक प्रवासी जखमी झाले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, अमरावतीमध्ये (Amravti News) बस दरीत कोसळून भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. अमरावतीच्या चिखलदराजवळ ही अपघाताची घटना घडली आहे. प्रवाशांनी भरलेली ही बस परतवाडा सेमाडोह घटांग रस्त्यावरुन जात असताना घाटात वळणाच्या रस्त्यावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस थेट दरीत कोसळली.

या अपघातात दोन महिला व एक बालक अशा तीन प्रवाशांचा मृत्यू झाला असून ३६ प्रवासी गंभीर जखमी झालेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्तांना मदत केली. दुर्घटनेतील जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

NASA Warning: पृथ्वीवर आदळणार महाकाय लघुग्रह? नासाचा मोठा इशारा

Marathi bhasha Vijay Live Updates : ठाकरेंच्या मेळाव्यासाठी मराठी कलाकारांची फौज, कोण कोण आले?

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Hockey Asia Cup: पाकिस्तान खेळणार 'आशिया कप', हॉकी संघ भारतात येणार: क्रीडा मंत्रालयाचा हिरवा कंदील

Underi : उंदेरी किल्ला कधी पाहिला का? पावसाळ्यात ट्रिप प्लान कराच

SCROLL FOR NEXT