महाराष्ट्र

शिंदे-फडणवीस स्थगिती सरकार; आमदार अमोल मिटकरींची टीका

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पदभार स्विकारताच कामाला सुरुवात करत महाविकास आघाडीने घेतलेल्या निर्णयांना स्थगिती दिली आहे.

जयेश गावंडे

अकोला: शिवसेनेचे (ShivSena) ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंड केले, त्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पदभार स्विकारताच कामाला सुरुवात करत महाविकास आघाडीने घेतलेल्या निर्णयांना स्थगिती दिली आहे. यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. राष्ट्रवादीचे आमदार अमोर मिटकरी (Amol Mitkari) यांनी यावर प्रतिक्रीया दिली आहे.

नगरविकास कामांचा तब्बल ९४१ कोटींचा निधी शिंदे सरकारने आज रोखला आहे. बारामती विधानसभा मतदार आणि रोहित पवार यांचा कर्जत-जामखेड मतदारसंघासह, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिंदे गटात न सहभागी झालेल्या शिवसेनेच्या आमदारांचा विकास कामांना आज शिंदे सरकारने स्थगिती दिली आहे. सध्या विराजमान झालेले सरकार हे महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या निर्णयला स्थगिती देण्याचे काम करत आहे. त्यामुळे हे शिंदे सरकार नव्हे तर स्थगिती देणार सरकार म्हणून असे यांची ओळख निर्माण झाली आहे, अशी बोचरी टीका राष्ट्रवादीचे (NCP) आमदार अमोल मिटकरी यांनी केली.

शिंदे-फडणवीस सरकारचा पवारांना दणका

महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या निर्णयांना स्थगिती देण्यात आली आहे. तर नव्या प्रकल्पांना मंजूरी देण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या मतदारसंघातील कामांना ब्रेक देण्यात आला आहे. या संदर्भात आमदार पवार (Rohit Pawar) यांनी फेसबुक पोस्ट केली आहे. मतदार संघातील कामांवरील स्थगिती उठवण्यासाठी मुंख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केली आहे.

आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या कर्जतृ-जामखेड या मतदारसंघात महाविकास आघाडी सरकारने दिवाणी न्यायालयाला मंजूरी दिली होती. या न्यायालयाला नव्या शिंदे-फडणवीस सरकारने रद्द केले आहे. या कामावरील स्थगिती उठवून पुन्हा मंजूरी देण्याची मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे. माझ्या कामाचा श्रेय तुम्ही घ्या, पण दिवाणी न्यायालय करा अशी विनंती पवार यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nikki Tamboli: बाईsss... निक्कीचे मेकअप साहित्य येतं लंडनहून, कोणत्या प्रॉडक्टची किंमत किती?

Ladki Bahin Yojana: ईकेवायसी करताना झालेली चूक दुरुस्त करायचीये? लाडक्या बहिणींनो ही स्टेप बाय स्टेप प्रोसेस फॉलो करा

Rajya Sabha election : शरद पवारांच्या नावाला काँग्रेसमधून विरोध? हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टच सांगितलं

Maharashtra Live News Update : दहिसरहुन गुंदवलीला येणाऱ्या मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड

Accident : ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी १८ दिवसापूर्वी पुण्यातून निघाले, पण गुजरातमध्ये काळाने घात केला; ३ जिवलग मित्रांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT