Amol Kolhe Saam Digital
महाराष्ट्र

Amol Kolhe : त्या अपघातात अमोल कोल्हे जखमी; मंचरच्या सभेपूर्वी गाठलं हॉस्पिटल

Amol Kolhe Injured : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या शिवस्वराज यात्रेला आजपासून सुरुवात होत आहे. या यात्रेदरम्यान जुन्नरमध्ये छत्रपती शिवजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करताना क्रेन कलंडली. यात खासदार अमोल कोल्हे जखमी झाले आहेत.

Sandeep Gawade

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या शिवस्वराज यात्रेला आजपासून सुरुवात होत आहे. शिवनेरीवरून आज या यात्रेचा शुभारंभ झाला, मात्र मोठा अनर्थ होता होता टळला. जुन्नर शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला क्रेनमधून पुतळ्याला हार घालून क्रेन खाली येत असताना अचानक क्रेनच्या ट्रॉलीत बिघाड झाला आणि क्रेन कलंडली. या अमोल कोल्हे जखमी झाले आहेत. त्यांच्या हाताला दुखापत झाली आहे.

या क्रेनमध्ये पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे, रोहिणी खडसे तसेच मेहबूब शेखही होते, मात्र थोडक्यात बचावले आहेत. त्यानंतर जुन्नरच्या लेण्याद्रीत अमोल कोल्हे सभेला हजर राहिले, पण मंचरच्या सभेपूर्वी त्यांनी रुग्णालय गाठलं. डॉक्टरांकडून उपचार घेत, हाताला बँडेज लावून ते यात्रेत सहभागी झाले आहेत. या दुर्घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

शरद पवार गटाने विधानसभा निवडणुकांची आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्या पार्श्वभूमीवर आजपासून शिवस्वराज्य यात्रेला सुरुवात करण्यात आली. विधानसभेच्या ज्या जागा शरद पवार गटाकडून लढवल्या जाणार आहेत, त्या मतदारसंघातून शिवस्वराज्य यात्रेला सुरुवात करणार येणार आहे. या यात्रेच्या पहिल्या ३१ मतदारसंघांची यादी जाहीर करण्यात आली होती. मुंबई, कोकण मराठवाडा अशा इतर भागांत देखील यात्रा निघणार आहे. शिवनेरी गडाच्या पहिल्या पायरीला अभिवादन करुन या यात्रेला सुरुवात होत आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे, रोहिणी खडसे, मेहबूब शेख आदी नेते यावेळी उपस्थित होते.

दरम्यान जुन्नर शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला क्रेनमधून पुतळ्याला हार घालून क्रेन खाली येत असताना अचानक क्रेनच्या ट्रॉलीत बिघाड झाला आणि क्रेन कलंडली. या अमोल कोल्हे जखमी झाले आहेत. त्यांच्या हाताला दुखापत झाली आहे. मात्र सुदैवाने मोठा अनर्थ टळला. अमोल कोल्हे यांनी थेड हॉस्पिटल गाठून उपचार घेतले. हाताला बॅन्डेज बांधून ते नंतर कार्यक्रमात सहभागी झाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT