शिवसेनाला गृह अन् महसूल खाते नाहीच, फडणवीस-नड्डा यांचं अमित शाह यांच्यासोबत खलबतं saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : पुण्यात मध्यरात्री खलबतं.. अमित शाहांची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंनी घेतली भेट, चर्चा काय झाली?

Nashik Raigad minister controversy : रायगड दौऱ्यापूर्वी अमित शाह यांनी पुण्यात देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची गुप्त भेट घेतली. रायगड आणि नाशिक पालकमंत्रिपदाच्या वादावर चर्चा झाल्याची माहिती मिळतेय.

Namdeo Kumbhar

Amit Shah Maharashtra visit 2025 : केंद्रीय मंत्री अमित शाह आज रायगडच्या दौऱ्यावर आहेत. सकाळी दहा वाजता अमित शाह पुण्याहून रायगडसाठी रवाना होणार आहे. किल्ले रायगडावर अमित शाह छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करणार आहेत. पण त्याआधीच पुण्याच्या हॉटेलमध्ये अमित शाह यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा झाली. पुण्यातील हॉटेलमध्ये तिन्ही नेत्यांमध्ये विविध विषयावर चर्चा झाल्याचे समजतेय.

अमित शाह आज रायगड दौऱ्यावर आहेत. यावेळी खासदार सुनील तटकरे यांनी त्यांना घरी स्नेहभोजनाचे आमंत्रण दिले आहे. अमित शाह यांच्या रायगड दौऱ्यात पालकमंत्रीपदाचा प्रश्न मार्गी लागू शकतो, असे म्हटले जातेय. अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यात एकनाथ शिंदे यांची नाराजी दूर करतील, असेही राजकीय विश्लेषक सांगत आहेत.

अमित शाह आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाही भेट घेणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून रायगड आणि नाशिक पालकमंत्रीपदाचा तिढा कायम आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी पालकमंत्रीपदाचा तिढा लवकरच सुटेल, जरा धीर दरा.. असे संकेत दिले होते. आज अमित शाह यांच्यासमोरच रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदावर चर्चा होणार आहे. या चर्चेमध्ये तोडगा निघू शकतो, असा अंदाज वर्तवला जातोय.

रायगड दौऱ्यासाठी शुक्रवारी रात्री अमित शाह यांचे पुण्यात आगमन झाले. अमित शाह पुण्यातील हॉटेलमध्ये मुक्कामी होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री हॉटेलमध्ये अमित शाह यांची भेट घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. या तिन्ही नेत्यांमध्ये पालकमंत्रिपदावर चर्चा झाल्याचेही सांगण्यात येत आहे. रायगडचे पालकमंत्रीपद अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आले आहे. त्यावर एकनाथ शिंदे यांच्या पक्षाने दावा केला आहे. रायगडमधील पालकमंत्री भरत गोगावले यांनी पालकमंत्रीपदावर दावा केला, त्यामुळे वाद चिघळला गेला. नाशिकमधील पालकमंत्रिपदावरही एकनाथ शिंदेंच्या पक्षाने दावा केला आहे. त्यामुळे अमित शाह यांच्या दौऱ्यात पालकमंत्रिपदाचा दावा निघू शकतो, असे सांगण्यात आलेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT