ambulance met with an accident near nanded saam tv
महाराष्ट्र

Nanded Accident News : रुग्णवाहिकेचा फुटला टायर; घडला भीषण अपघात, एकाचा मृत्यू, चाैघे गंभीर जखमी

या रुग्णवाहिकेत पाच जण हाेते. हे सर्वजण जखमी झाले. नागरिकांनी जखमींना तात्काळ खाजगी वाहनाने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

Siddharth Latkar

- संजय सूर्यवंशी

Nanded News :

नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील कांकाडी गावाजवळ देगलूर येथुन रुग्णांना घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेचा अपघात झाला. या अपघातात एकाचा मृत्यु झाला तर चार जण जखमी झाले आहेत. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या घटनेबाबत मिळालेली माहिती अशी : नांदेड शासकीय रुग्णालय विष्णुपरी येथे रुग्णांना घेऊन येणाऱ्या भरधाव वेगातील रुग्णवाहिकेचे समोरील टायर फुटला. यामुळे रुग्णवाहिका रस्त्याच्या खाली जाऊन पालटली. त्यानंतर घटनास्थळावरील नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. (Maharashtra News)

या रुग्णवाहिकेत पाच जण हाेते. हे सर्वजण जखमी झाले. नागरिकांनी जखमींना तात्काळ खाजगी वाहनाने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या घटनेतील एका जखमीचा मृत्यू झाला. अन्य चाैघा जखमींवर नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत अशी माहिती पाेलिसांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : बिबट्याची दहशत, उन्हाचा तडाखा आणि गारपिटीचा कहर; मेंढपाळांवर तिहेरी संकट

Gold Price Today: सराफा बाजार उघडताच सोन्याच्या दरात मोठा बदल, वाचा २२ अन् २४ कॅरटचे आजचे दर

Namo Shetakri Yojana: शेतकऱ्यांनो नमो शेतकरी योजनेचे ₹२००० मिळाले का? अशा पद्धतीने चेक करा स्टेट्स

नांदेडमध्ये रक्तरंजित थरार ! गँगवारमध्ये तिघांचा मृत्यू, शहरात दहशत

Dandruff Home Remedy : केस धुवण्यापूर्वी करा 'हे' काम, टाळूला येणार नाही खाज अन् कोंडाही होईल गायब

SCROLL FOR NEXT