Ambernath Shiv Sena News Saam tv
महाराष्ट्र

Shiv Sena: काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पायी गहाण असलेला धनुष्यबाण एकनाथाने सोडवला; अंबरनाथमध्ये युवा सेनेकडून लावले बॅनर्स

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पायी गहाण असलेला धनुष्यबाण एकनाथाने सोडवला; अंबरनाथमध्ये युवा सेनेकडून लावले बॅनर्स

अजय दुधाणे

अंबरनाथ : एकनाथ शिंदे यांना निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह दिल्यानंतर (Ambernath) अंबरनाथमध्ये युवा सेनेकडून बॅनर्स लावण्यात आले आहेत. ज्यामध्ये (Congress) ‘काँग्रेस– राष्ट्रवादीच्या पायी गहाण असलेला आपला धनुष्यबाण एकनाथाने सोडवला’, असा मजकूर लिहून बाळासाहेब ठाकरे हे आनंद दिघे यांना उद्देशून म्हणत असल्याचे दाखवले आहे. (Maharashtra News)

अंबरनाथमध्‍ये युवासेनेकडून लावलेल्‍या या बॅनर्समुळे शिवसेना आणि ठाकरे गट यांच्यात पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. अंबरनाथच्या वडवली परिसरातील रोटरी क्लब चौकात हे बॅनर लावण्यात आले आहेत. युवा सेनेच्या राज्य कार्यकारणी सदस्य स्नेहल कांबळे यांनी हे बॅनर्स लावले आहे.

शिवसेना (Shiv Sena) हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांना मिळाल्यानंतर सर्वसामान्य कार्यकर्त्याला आनंद झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पायी गहाण ठेवलेला आपला धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांनी सोडवला असून याचा कार्यकर्त्यांना आनंद असल्यानेच आपण हा बॅनर लावल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: सुवर्णनगरीत सोन्याने उच्चांक गाठला; दसऱ्याआधी १०५० रुपयांची वाढ; वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update: अकोला जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 29,327 हेक्टर क्षेत्रावर नुकसान

Hug Benefits : पार्टनरला जादूची झप्पी मारा अन् रिलॅक्स व्हा... वाचा फायदे

Palghar : खड्ड्यामुळे बस सेवा बंद; शालेय विद्यार्थ्यांना करावी लागतेय पायपीट

Tandalachi kheer: दसऱ्याला बनवा काहीतरी गोडधोड,तांदळाची खीर बनवण्याची सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT