वर्धा : जिल्हा प्रशासनाच्या कार्यक्षेत्रात असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ लागून असलेल्या एसपी कार्यालय जवळ पेट्रोल पंप पोलीस वेल्फेअरच्या वतीने सुरू करण्याचा मानस जिल्हा पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांनी बांधला आहे. मात्र ह्याला आंबेडकरी जनतेने तीव्र विरोध दर्शविला आहे. जिल्ह्यातील आंबेडकरी समाजातील प्रत्येक भागातून छोटे छोटे मोर्चे घेऊन मोठ्या प्रमाणात पेट्रोल पंप हटाव कृती समितीच्या धरणे आंदोलन ठिकाणी नागरिक एकत्रित झाले आहेत. (Ambedkarite people's agitation not to set up petrol pump near Babasaheb's statue)
हे देखील पहा -
महिन्याभरापासून जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि आंबेडकरी जनता यांच्यात चर्चेच्या फेऱ्या झाल्या यात मोर्चेकरऱ्यांना पेट्रोल पंप होणार नाही असं आश्वासन देण्यात आलं. पण पोलिसांनी पेट्रोल पंप चे काम सुरूच ठेवल्याने आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ आंबेडकरी समाजातील प्रत्येक भागातून छोटे छोटे मोर्चे घेऊन मोठ्या प्रमाणात पेट्रोल पंप हटाव कृती समितीच्या धरणे ठिकाणी एकत्रित झाले आहेत. याचा उद्रेक होऊ नये म्हणून पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला, तसेच अग्निशामन दलाच्या गाड्या ही तिथे ठेवण्यात आल्या आहेत. उद्रेक झाला तर याला आटोक्यात आणण्यासाठी पोलीस प्रशासनाने आपली फौज सज्ज ठेवली आहे अशी माहिती स्मिता नगराळे यांनी दिली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून हाकेच्या अंतरावर जिल्हाधिकारी कार्यालय आहे. जिल्ह्यातील निवडणुकीची रॅली असो की आंदोलनाचे मोर्चे हे सगळे याच पुतळ्याजवळ येऊन थांबतात. पुढे फक्त निवेदन देणारे पाच लोक पाठविल्या जातात त्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात गर्दी असते. तसेच जयंती पुण्यतिथीला मेणबत्ती जाळून अभिवादन केल्या जाते, त्यामुळे पेट्रोल पंपाला धोका होऊ शकतो .पोलीस प्रशासनाकडे इतरही जागा आहेत तिकडे त्यांनी हा पेट्रोल पंप बनवावा जेणेकरून सुरक्षेच्या दृष्टीने योग्य राहील. नामांतरास सारखा तीव्र मोठा लढा आम्हाला देण्याची वेळ आली आहे, असं आंदोलनकारी शारदा झांबरे म्हणाल्या.
पुतळ्याला लागूनच जिल्हा क्रिडा संकुल आहे,पोलीस कवायती ग्राउंड आहे इथेही खेळ क्रीडा भरविल्या जातात. ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल क्रीडा भवनातून जाहीर केले जातात तिथे फटाक्याची मोठ्या प्रमाणात आतिषबाजी होते. निवडणुकांची शेवटची रॅली तिथेच येऊन थांबते तेव्हा ही मोठ्या प्रमाणात फटाक्याची आतिषबाजी होते. त्यामुळे पेट्रोल पंपाला मोठ्या प्रमाणात धोका आहे. पेट्रोल पंप स्थलांतरित करून दुसऱ्या जागेत न्यावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पेट्रोल पंप हटाव कृती समितीच्या वतीने देण्यात आला आहे.
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.