Ambarnath News Saam tv
महाराष्ट्र

Ambarnath News : तोंडाला मास्क, हातात काठ्या घेऊन फिरताय तरुण; अंबरनाथमध्ये रात्री दुचाकीवर टोळक्याची 'राउंडिंग'

Ambarnath : हत्यार घेऊन रस्त्याने फिरत जोरजोरात आरोड्या मारत दहशत माजविण्याचा अनुषंगाने फिरत असल्याचे प्रकार घडले आहेत अंबरनाथमधील काही भागात लाठ्या- काठ्या घेऊन तरुणांचा एक टोळकं फिरत असल्याचे समोर आले

अजय दुधाणे

अंबरनाथ : अंबरनाथमध्ये रात्रीच्या वेळी काही तरुण तोंडाला मास्क लावून दुचाकीवर संशयास्पद रित्या फिरत असल्याची बाब समोर आली आहे. खुंटवली, खामकरवाडी भागात हे तरुण फिरताना आढळले असून ते नेमके कुणाचा शोध घेण्यासाठी किंवा कुणाची रेकी करण्यासाठी फिरत आहेत? असा प्रश्न परिसरातील नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. 

हत्यार घेऊन रस्त्याने फिरत जोरजोरात आरोड्या मारत दहशत माजविण्याचा अनुषंगाने फिरत असल्याचे प्रकार अनेक ठिकाणी घडलेले आहेत. शिवाय रात्रीच्या सुमारास खून, दरोड्याच्या घटना घडत असताना अंबरनाथमधील काही भागात लाठ्या- काठ्या घेऊन तरुणांचा एक टोळकं फिरत असल्याचे समोर आले आहे. यामुळे नागिकांमध्ये दहशत पसरली असून हे तरुण कोणत्या कारणाकरिता फिरत आहेत; असा प्रश्न निर्माण केला जात आहे. 

११ तरुण दिसले फिरताना 
अंबरनाथमधील खुंटवली, खामकरवाडी हा परिसर राजकीयदृष्ट्या संवेदनशील म्हणून ओळखला जातो. या परिसरात सोमवारी मध्यरात्री एक ते दीडच्या दरम्यान चार दुचाकींवरून ११ तरुण तोंडाला मास्क लावून फिरत होते. यापैकी काही जणांच्या हातात बांबू, काठ्याही होत्या. हे सर्वजण दुचाकीने फिरत असल्याचे समोर आले आहे. 

तरुण सीसीटीव्ही कैद 

सर्व अकरा तरुण हे चार दुचाकींवर खुंटवली, खामकरवाडी भागातून जाताना सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. याबाबत पोलिसांना देखील माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे पोलिसांनी वेळीच गांभीर्याने दखल घेऊन या भागात नुसती गस्त नव्हे, तर या भागावर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palghar Tourism : २०० रूपयात वीकेंड करा एन्जॉय, पालघरमधील 'या' ठिकाणांना भेट द्याच

IPL मध्ये खेळू दिले नाही, RCB चा स्टार खेळाडू थेट कोर्टात गेला; नेमकं प्रकरण काय?

Maharashtra Live News Update : पुण्यात पालखी सोहळ्यावर मधमाश्यांचा हल्ला; ६५ जण जखमी

KDMC : केडीएमसीमधील धक्कादायक प्रकार उघड, महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग केल्याचा आरोप; वरिष्ठ लिपिक निलंबित

Chanakya Niti: नोकरीत यश मिळवायचंय? चाणक्यांचे हे अनमोल विचार नक्की वाचा, मिळेल घवघवीत यश

SCROLL FOR NEXT