Ambarnath News Saam tv
महाराष्ट्र

Ambarnath News : बाप्पाच्या मोदकाचा २ लाख २२ हजारात लिलाव; आमदार पत्नीने लावली सर्वाधिक बोली

Ambarnath News : अंबरनाथमधील खाटूश्याम मित्र मंडळाकडून बाप्पासमोर ठेवलेल्या महामोदकाचा विसर्जनाच्या दिवशी लिलाव करण्याची प्रथा आहे.

अजय दुधाणे

अंबरनाथ : गणेशोत्सव नुकताच पार पडला असून गणपती बाप्पाला मोदकांचा प्रसाद दिला जात असतो. अशाच प्रकारे अंबरनाथमध्ये गणपती बाप्पासमोरील दिलेल्या मोदक प्रसादाचा तब्बल २ लाख २२ हजार रुपयांना लिलाव करण्यात आला. अंबरनाथमधील खाटूश्याम मित्र मंडळाकडून करण्यात आलेल्या या लिलावात अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या पत्नी डॉ. शिल्पा किणीकर यांनी हि सर्वाधिक बोली लावत हा मोदक खरेदी केला.

अंबरनाथमधील (Ambarnath) खाटूश्याम मित्र मंडळाकडून बाप्पासमोर ठेवलेल्या महामोदकाचा विसर्जनाच्या दिवशी लिलाव करण्याची प्रथा आहे. साधारण मागील १५ वर्षांपासून हि परंपरा मंडळाकडून सुरु आहे. या लिलावात आज ६७ हजार रुपयांपासून बोली सुरू करण्यात आली. यावेळी अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या कुटुंबीयांनी देखील लिलावात सहभागी होत बोली लावली आणि सर्वाधिक २ लाख २२ हजार रुपयांची बोली लावत हा मोदक खरेदी केला. 

चौथ्यांदा बाप्पाचा आशीर्वाद नक्की मिळेल : डॉ. शिल्पा किणीकर

दरम्यान आमदार किणीकर यांना आत्तापर्यंत ३ वेळा अंबरनाथकरांनी आशीर्वाद दिला असून यंदाही बाप्पाच्या आशीर्वादाने ते चौथ्यांदा निवडून येतील; असा विश्वास आमदार किणीकर यांच्या पत्नी डॉ. शिल्पा बालाजी किणीकर यांनी व्यक्त केला. तर खाटूश्याम मंडळाचे प्रमोदकुमार चौबे यांनीही लिलावानंतर आमदार डॉ. किणीकर यांना शुभेच्छा दिल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Local Train Update : नालासोपारा-वसईत ट्रॅकवर पाणी साचण्याची कटकट संपणार, रेल्वेने घेतला 'हा' मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: दोषी अधिकारी आणि कंत्राटदारावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा : अमोल कोल्हे

Filmmaker Death: प्रसिद्ध चित्रपट निर्मात्यांचे ५७ व्या वर्षी निधन, सिनेसृष्टीवर शोककळा

Relationship Tips: पार्टनर फक्त 'टाईम पास' करतो? 'या' 7 संकेतांवरून ओळखा मनातील खोट

Indian Railways : रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! WhatsApp वरचं तिकीट दाखवून प्रवास करता येणार नाही, हे कागदपत्रेसोबत असणे अनिवार्य

SCROLL FOR NEXT